शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण! Sensex 1,300 अंकांपेक्षा अधिकने कोसळला

Share Market News Updates
Share Market News Updatesesakal

मुंबई : शेअर मार्केटमध्ये देशांतर्गत शेअर बाजारांमध्ये शेटवटच्या तासांमध्ये प्रचंड घसरण झाली आहे. दुपारी 2 च्या सुमारास, बीएसई सेन्सेक्सने मोठी झेप घेतली आणि 1,300 हून अधिक अंकांनी खाली आला. दुपारी 2.01 वाजता सेन्सेक्स 1,325 अंकांनी घसरल्याची नोंद करण्यात आली होती तर, निर्देशांक 57,320 पर्यंत खाली आला होता.

Share Market News Updates
निवणुकीपूर्वी राम रहीम बाहेर; पंजाबमधील राजकीय समीकरणं बदलणार?

आज खासगी बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी घसरण पाहण्यास मिळाली. निफ्टी बँक निर्देशांक 1 टक्क्यांनी घसरला. कोटक, इंडसइंड बँक आणि एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तर, खासगी बँकिंग शेअर्स आणि वित्तीय शेअर्समध्ये विक्री दिसून आली. दरम्यान, जागतिक पातळीवर कच्च्या तेलातील तेजी थांबण्याची चिन्हे दिसत नसून, आज ब्रेंट आशियाई बाजारात प्रति बॅरल 94 डॉलरच्या पातळीवर पोहोचला आहे. गेल्या एका महिन्यात याची किंमत 14 टक्क्यांहून अधिक वाढली असून, येत्या आठवड्यात ही किंमत 100 डॉलरच्या वर जाऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com