मंगळवारीही बाजारात घसरण, आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shares

मंगळवारीही बाजारात घसरण, आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल ?

शेअर बाजार मंगळवारी लाल रंगात म्हणजेच घसरणीवर बंद झाला. ऑटो, बँकिंग आणि वित्तीय सेवा आणि रियल्टीमुळे सर्वाधिक नुकसान झाले. मात्र, फार्मा, मीडिया आणि मेटल शेअर्स तेजीसह बंद झाले. सेन्सेक्स निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स 166.33 अंकांनी म्हणजेच 0.29 टक्क्यांनी घसरून 58,117.09 वर बंद झाला. आणि निफ्टी 43.40 म्हणजेच 0.25 टक्क्यांनी घसरून 17,324.90 वर बंद झाला आहे. मंगळवारी पॉवर फार्मा, ऑइल आणि गॅस तेजीसह बंद झाले. ऑटो, एफएमसीजी आणि पीएसयू बँक निर्देशांक लाल रंगात म्हणजेच घसरणीसह बंद झाले. (Share market falls on Tuesday 15 dec 2021)

महागाईच्या आकडेवारीत वाढ आणि आशियाई बाजारातील कमकुवतपणा यामुळे, यूएस FED च्या धोरणात्मक घोषणेपूर्वी भारतीय बाजारातील कमजोरी वाढत असल्याचे दिसून आल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले.

वोलॅटिलिटी इंडीकेटर इंडिया VIX मध्ये देखील वाढ झाली आहे. अस्थिरता त्याच्या वरच्या टोकाजवळ असल्याचे मोतीलाल ओसवालचे चंदन तापडिया म्हणाले. बाजारातील स्थिरतेसाठी, ते 15-14 च्या झोनमध्ये येणे आवश्यक आहे. सध्या ते 16.95 च्या आसपास दिसत असल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा: सेन्सेक्स 166 अंशांनी घसरला; निर्देशांकांची तिसरी घसरण

निफ्टी 17,000 आणि 17,700 या मोठ्या झोनमध्ये व्यवहार करताना दिसेल असे संकेत ऑप्शन डेटामधुन मिळत असल्याचे मोतीलाल ओसवालचे चंदन तापडिया म्हणतायत. मंगळवारच्या व्यापारात निफ्टीने डेली स्केलवर एक बुलिश कँडल तयार केली आहे आणि 100 SMA जवळ बंद झाली आहे. आता निफ्टीला 17,500 आणि 17,600 च्या दिशेने जाण्यासाठी 17,350 ची पातळी ओलांडावी लागेल. निफ्टीला खाली, 17,200-17,100 वर सपोर्ट दिसत आहे.

तांत्रिकदृष्ट्या बाजाराने सुधारणेचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे आणि सध्या त्याच्या सपोर्ट लेव्हलजवळ व्यवहार करत असल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. इंट्राडे चार्टवर घसरणीनंतर, निफ्टीने हायर बॉटम फॉर्मेशन तयार केला आहे जी सध्याच्या पातळीपासून पुलबॅक रॅलीचे संकेत देत आहे.

हेही वाचा: तीन वर्षात पेट्रोल डिझेल च्या टॅक्सवर सुमारे ८.०२ लाख कोटींची कमाई

आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल ?

( which stocks will you keep an eye on today 16 Dec 2021)

पॉवर ग्रीड (POWERGRID )

डीविस लॅबोरेटरी (DIVISLAB)

ॲक्सिस बँक (AXISBANK)

नेस्ले इंडिया (NESTLEIND)

डॉक्टर रेड्डिज (DRREDDY)

झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)

एल अँड टी फायनान्स होल्डिंग्स (L&TFH)

टोरंट पॉवर (TORNTPOWER)

भारत हेवी इलेक्ट्रिकल (BHEL)

रॅमको सिमेंट्स (RAMCOCEM)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Web Title: Share Market Falls On Tuesday 15 Dec 2021 Which Stocks Will You Keep An Eye On Today 16 Dec 2021

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Share MarketStock Market
go to top