नवीन वर्षात पाच स्टॉक्स तुम्हाला करतील मालामाल!

शेअर बाजार तज्ज्ञ सुमीत बगडियाच्या यांनी 2022 चे मल्टीबॅगर ठरू शकणाऱ्या 5 स्टॉकची लिस्ट दिली आहे.
 stock market
stock marketesakal
Summary

शेअर बाजार तज्ज्ञ सुमीत बगडियाच्या यांनी 2022 चे मल्टीबॅगर ठरू शकणाऱ्या 5 स्टॉकची लिस्ट दिली आहे.

Multibagger stocks for 2022 : 2021 हे वर्ष हे गुंतवणूकदारांसाठी उत्तम परतावा (Refund)देणारे वर्ष ठरले आहे. 2021 मध्ये निफ्टीने (Nifty) सुमारे 22 टक्के परतावा दिला. तर मिडकॅप्सनी (Midcaps) सुमारे 42 टक्के आणि स्मॉलकॅप्सनी 53 टक्के परतावा दिला आहे. 2021 मध्ये अनेक स्टॉक मल्टीबॅगर (Stock multibagger) ठरले. यामध्ये काही पेनी स्टॉकचाही समावेश आहे. आता गुंतवणूकदार 2022 पासूनही अशीच अपेक्षा करत आहेत. त्यामुळेच शेअर बाजार तज्ज्ञ सुमीत बगडियाच्या यांनी 2022 चे मल्टीबॅगर ठरू शकणाऱ्या 5 स्टॉकची लिस्ट दिली आहे.

सुझलॉन एनर्जी (Suzlon Energy) : मंथली चार्टवर, या स्टॉकने 5 महिन्यांचा ब्रेकआउट दिला आहे आणि जुलै 2021 मधील 9 रुपये 45 पैशांच्या आधीच्या उच्चांकावर आहे. हे शेअर्स 10 ते 8 रुपयांच्या दरम्यान खरेदी करा आणि 6 रुपयांच्या स्टॉप लॉससह 15-20 रुपयांचे टारगेट ठेवा असे बागडीया म्हणाले.

 stock market
नववर्षात मिडकॅप आयटी क्षेत्रातले हे 2 स्टॉक्स देतील मजबूत परतावा, तज्ज्ञांना विश्वास

MMTC : मंथली चार्टवर बुलिश फ्लॅग पॅटर्न तयार करत आहे, जो एक सकारात्मक संकेत आहे. हे स्टॉक 44 रुपयांच्या आसपास खरेदी करणे योग्य ठरेल असे ते म्हणाले. 60-80 रुपयांचे टारगेटसाठी 35 रुपयांवर स्टॉप लॉस ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

सुबेक्स (Subex) : मंथली चार्टवर या स्टॉकमध्ये ब्रेकआउट दिसत आहे. हे शेअर्स 54 रुपये किंवा 50 रुपयांच्या आसपास मिळत असल्यास, 40 रुपयांच्या स्टॉप लॉससह 70-80 रुपयांच्या टारगेटसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक 2022 मध्ये तिप्पट अंकात जाऊ शकतो. कारण कोविड नंतरच्या परिस्थितीत आयटी कंपन्यांसाठी मोठी क्षमता आहे असे सुमीत बगडिया म्हणाले.

 stock market
मिडकॅप सेगमेंटचे स्टॉक्स तुमच्या पोर्टफोलियोमध्ये आहेत का?

Vodafone Idea : सुमीत बगडिया यांना या स्टॉकमध्ये आणखी वाढ होण्याची पूर्ण क्षमता दिसते. 14-13 रुपयांच्या दरम्यान 10 रुपयांच्या स्टॉपलॉससह 20-25 चे टारगेटसाठी सांगितले असे त्यांचे मत आहे. हा टेलिकॉम स्टॉक 28-30 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. 2022 मध्ये मेड इन इंडिया 5G रोल आउट होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दूरसंचार शेअर्सना मोठा फायदा होईल.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com