Share Market: या कंपनीत गुंतवणुकीची सुवर्ण संधी, मिळणार भरभक्कम परतावा; तज्ज्ञांचा विश्वास... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market: या कंपनीत गुंतवणुकीची सुवर्ण संधी, मिळणार भरभक्कम परतावा; तज्ज्ञांचा विश्वास...

Share Market: सोमनी सिरॅमिक्सच्या (Somany Ceramics) शेअर्सने त्याच्या गुंतवणुकदारांना चांगला परतावा दिला आहे, पण या वर्षी हे शेअर्स जवळपास 43 टक्क्यांनी घसरले आहेत. पण आता या शेअर्समध्ये 40 टक्के वाढ होईल असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजने सोमानी सिरॅमिक्समधील गुंतवणुकीसाठी 740 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे, जी सध्याच्या किंमतीपेक्षा 40 टक्के जास्त आहे. त्याचे शेअर्स शुक्रवारी बीएसईवर 528.70 रुपयांवर बंद झाले होते.

23 जानेवारी 2009 रोजी सोमनी सिरॅमिक्सच्या शेअर्सची किंमत केवळ 8.40 रुपये होती. त्याची किंमत आता 528.70 रुपये झाली आहे. याचा अर्थ जानेवारी 2009 मध्ये एखाद्याने यात 1 लाख रुपये गुंतवले असते तर सुमारे तेरा वर्षांत याचे शेअर्स 63 पटीने वाढून 63 लाख रुपये झाले असते. त्यामुळेच सोमनी सिरॅमिक्सचे शेअर्स लाँग टर्ममध्ये चांगला परतावा देत असल्याचे लक्षात येते. सध्या हे शेअर्स कमी किंमतीवर उपलब्ध असल्याने शेअर्समध्ये खरेदी करण्याची ही योग्य संधी असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. कारण येत्या काळात हे शेअर्स आणखी जोमाने वर येतील असा विश्वास तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

हेही वाचा: गौतमी नाचली, तुमचं काय गेलं?

गेल्या वर्षी 17 नोव्हेंबर 2021 रोजी त्याचे शेअर्स 952.45 रुपयांवर होते, जे एका वर्षातील उच्चांक आहे. यानंतर, 23 जून 2022 रोजी, शेअर्सच्या विक्रीमुळे 46 टक्क्यांनी घसरून 512.50 रुपये झाले. पण त्यानंतर, चढ-उतारांच्या दरम्यान त्यात पुन्हा 3% वाढ झाली आहे पण सोमनी सिरॅमिक्सचे शेअर्स आणखी 40% वाढू शकतात असा विश्वास व्यक्त केला आहे.

हेही वाचा: Share Market मध्ये Profit मिळवायचाय? तर 'या' ट्रिक्स करा फॉलो

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.