Share Market Investment : फक्त 10 दिवसांत या शेअरने गुंतवणुकदारांचे पैसे केले दुप्पट

सोमवारी इव्हान्स इलेक्ट्रिकचे शेअर्स जवळपास 5 टक्क्यांनी वाढून 199.20 रुपयांवर बंद झाले.
Share Market Investment
Share Market Investmentesakal

Evans Electric Ltd Share Market Investment : इव्हान्स इलेक्ट्रिक लिमिटेडने या कंपनीने कमाल केली आहे, त्यांनी गेल्या 10 दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. सोमवारी इव्हान्स इलेक्ट्रिकचे शेअर्स जवळपास 5 टक्क्यांनी वाढून 199.20 रुपयांवर बंद झाले, जे आता त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे.

यासह, सलग चौथ्या दिवशी कंपनीच्या शेअर्सने मागच्या अप्पर सर्किटला धडक दिली. दहा दिवस आधी 11 नोव्हेंबरला इव्हान्स इलेक्ट्रिकचे शेअर्स सुमारे 99 रुपयांवर व्यवहार करत होते, जे आता वाढून 199.20 रुपये झाले आहेत. म्हणजेच, अवघ्या 10 दिवसांत या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 105.36 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे.

Share Market Investment
Share Market: शेअर बाजारात पडझडीचं सत्र सुरू, सेन्सेक्स 501 अंकानी गडगडला

इव्हान्स इलेक्ट्रिकचे शेअर्स बीएसईवर 17 मे 2019 रोजी लिस्ट झाले, त्यावेळी शेअरची किंमत रुपये 66.50 होती. म्हणजेच गेल्या साडेतीन वर्षांत यात सुमारे 199.55 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, गेल्या एका वर्षात, त्याने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 206.23% परतावा दिला आहे.

Share Market Investment
Share Market : 'या' बँकेचे मार्केट व्हॅल्यू 50,000 कोटीच्या पार; एका महिन्यात शेअर्समध्ये 60% वाढ...

2022-23 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत म्हणजेच एप्रिल-सप्टेंबर या काळात कंपनीचा नफा वाढून 2.73 कोटी रुपये झाला, जो मागील वर्षी याच कालावधीत 37.67 लाख रुपये होता. कंपनीच्या व्यवसायात दमदार वाढ झाल्याने शेअर्समध्ये सातत्याने वाढ होते आहे.

Share Market Investment
Share Market मध्ये आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

कंपनी काय करते ?

इव्हान्स इलेक्ट्रिक मोठ्या मोटर्स, जनरेटर आणि ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या व्यवसायात आहे. अवजड उद्योगांना मोठ्या इलेक्ट्रिक मशिन्स लागतात. ही यंत्रे जुनी होत असल्याने त्यांना अधिक दुरुस्ती आणि देखभालीची आवश्यकता असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीमध्ये प्रमोटर्सची 59.44 टक्के, इंडीविज्युअल शेयरहोल्डर्सची 23.32 टक्के आणि निल्सन लिओनेल फर्नांडिस यांची 14.69 टक्के हिस्सेदारी आहे. कंपनीचे मार्केट कॅप सध्या 27.33 कोटी रुपये आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com