Share Market : दिग्गज टायर कंपनीच्या शेअरमध्ये तेजीचे संकेत, तुमच्याकडे आहे का हा शेअर? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market : दिग्गज टायर कंपनीच्या शेअरमध्ये तेजीचे संकेत, तुमच्याकडे आहे का हा शेअर?

Top Shares In Market : शेअर मार्केटमध्ये सतत अस्थिरतेचे वातावरण असते. अशात तुम्ही कमावलेला नफा कधीही कमी होऊ शकतो. त्यामुळे शेअर बाजाराच्या अस्थिर वातावरणात प्ले सेफ हे तंत्र बरेच जण अवलंबतात. त्यामुळेचे कधीही चांगल्या दर्जेदार शेअर्समध्ये पैसे गुंतवणे गरजेचे आहे. नुकतेच जेके टायर अँड इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअरमध्ये मंगळवारी 5% पेक्षा जास्त तेजी दिसून आली. सुमारे 21 दिवस कंसोलिडेट राहिल्यानंतर, स्टॉक त्याच्या 20-डीएमएच्या वर आणि मागच्या स्विंग हायवर ट्रेड करत आहे.

हेही वाचा : Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

हेही वाचा: मेटा, ट्विटर, ॲमेझॉनमधील नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांना 'ही' कंपनी करणार मदत

तांत्रिकदृष्ट्या स्टॉकने डेली टाइम फ्रेमवर प्राइस वॉल्यूम ब्रेकआउटमध्ये प्रवेश केला आहे. एमएसीडीने बुलिश क्रॉसओव्हरचे संकेत दिले आहेत शिवाय ओबीवीही वाढला आहे, जे स्टॉकसाठी चांगले संकेत आहेत. 14 दिवसांचा आरएसआय (60.18) बुलीश झोनमध्ये दाखल झाला आहे. यावरून स्टॉकची वाढती ताकद दिसून येते. थोडक्यात, हा शेअर दमदार झाला आहे आणि त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: 2 वर्षात हा शेअर 118 रुपयांवरुन 503 रुपयांवर, आणखी तेजीचे संकेत...

जेके टायर अँड इंडस्ट्रीज लिमिटेडचा स्टॉक यावर्षी जवळपास 30% वाढला आहे. या कालावधीत त्याने आपल्या बरोबरीच्या बऱ्याच कंपन्यांना मागे टाकले आहे. येत्या तिमाहीत मजबूत मागणी आणि चांगली व्यवसाय वाढ होण्याची व्यवस्थापनाला आशा आहे. सध्या जेके टायरचा शेअर 180 रुपयांवर ट्रेड करत आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांनी हा शेअर त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करावा असा सल्ला शेअर बाजार एक्स्पर्ट देत आहेत.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.