Share Market : या फार्मा स्टॉकने 1 लाखाचे केले 4 कोटी, 23 वर्षात कोट्यावधी रिटर्न

गुंतवणूकदारांनी लाँग टर्मसाठी योग्य कंपनीत गुंतवणूक केली
Share Market
Share Market esakal

Shares: सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज लिमिटेडच्या (Sun Pharmaceutical Industries Limited) शेअर्सने गेल्या 23 वर्षात त्यांच्या गुंतवणूकदारांना 39,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. गुंतवणूकदारांनी लाँग टर्मसाठी योग्य कंपनीत गुंतवणूक केली आणि त्यांची गुंतवणूक कायम ठेवली तर काही हजार किंवा लाखांची गुंतवणूक करून ते करोडोंचा नफा कमवू शकतात असे तज्ज्ञ सांगतात.

सन फार्माचा शेअर नुकताच एनएसईवर 896.70 रुपयांवर बंद झाला. पण, 23 वर्षांपूर्वी 1 जानेवारी 1999 रोजी, जेव्हा सन फार्माच्या शेअर्सने एनएसईवर पहिल्यांदा ट्रे़ड करायला सुरुवात केली तेव्हा त्याची किंमत फक्त 2.27 रुपये होती, जी आता सुमारे 39,402 टक्क्यांनी वाढून 896.70 रुपये झाली आहे.

एखाद्या गुंतवणूकदाराने 23 वर्षांपूर्वी 1 जानेवारी 1999 रोजी सन फार्माच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि आज त्याचे 3.95 कोटी झाले असते. तसेच 23 वर्षांपूर्वी सन फार्माच्या शेअर्समध्ये फक्त ३० हजार रुपये गुंतवले असते तर आज तिचे 1 कोटी 18 लाख रुपये झाले असते.

Share Market
Share Market: शेअर बाजारात तेजीनंतर घसरण, सेन्सेक्स 188 अंकांनी घसरला

गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 1.98 टक्के वाढ झाली आहे. तर गेल्या वर्षभरात त्याची किंमत सुमारे 15.69 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या एका वर्षात त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना 78.18 टक्के परतावा दिला आहे.

जूनच्या तिमाहीत सन फार्मास्युटिकलचा कंसोलिडेटेड नफा 43 टक्क्यांनी वाढून 2,061 कोटींवर पोहोचला आहे, जो मागील वर्षीच्या तिमाहीत 1,444 कोटी रुपये होता. दुसरीकडे, कंपनीचे कंसोलिडेटेड उत्पन्न 10.7 टक्‍क्‍यांनी वाढून 10,762 कोटी रुपये झाले आहे, जे मागील वर्षीच्या तिमाहीत 9,719 कोटी रुपये होते.

Share Market
Share Market : या 2 स्टॉक्समध्ये मिळेल बंपर रिटर्न, तज्ज्ञांचा सल्ला

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com