
Share Market: सेन्सेक्स 300 तर निफ्टी 100 अंकांनी घसरला; एशियन पेंट, अदानी पोर्ट्समध्ये घसरण
शेअर बाजारातील घसरणीचं सत्र आजही सुरुच राहिलं. आज सकाळी सकारात्मक सुरुवातीनंतर दिवसअखेर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली. सेन्सेक्स 303.35 अंकांनी अर्थात 0.56 टक्क्यांनी घसरून 53749 वर बंद झाला, तर निफ्टी 99.35 अंकांनी म्हणजेच 0.62 टक्क्यांनी घसरून 16,025.80 वर सुरु झालं. निफ्टी 50 मधील NTPC, HDFCLIFE, SBILIFE, BHARTIARTL, ONGC सह 18 शेअर्समध्ये वाढ नोंदवली गेली, तर ASIANPAINT, ADANIPORTS, DIVISLAB, UPL, TECHMसह 32 शेअर्समध्ये घसरणीची नोंद झाली.
हेही वाचा: म्युच्युअल फंडात 100 रुपयांसह सुरु करा गुंतवणूक, देईल चांगला परतावा...
मंगळवारी सुरुवातीची तेजी गमावत बाजार लाल चिन्हात बंद झाल्यानंतर आज बुधवारी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी आज किरकोळ वाढीसह सुरु झाले. सेन्सेक्स 201.46 अंकांच्या वाढीसह 54,254.07 वर सुरु झाला, तर 22.1 अंकांच्या वाढीसह 16,196.35वर सुरु झाला. निफ्टी 50 मधील 44 शेअर्समध्ये वाढ झाली, तर 6 शेअर्स घसरणीसह सुरु झाली.
Web Title: Share Market Latest Updates Fall In Sensex And Nifty
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..