
Share Market: शेअर बाजार सकारात्मक; सेन्सेक्स 201 तर निफ्टी 22 अंकांच्या वाढीसह सुरु
Share Market Latest Updates: मंगळवारी सुरुवातीची तेजी गमावत बाजार लाल चिन्हात बंद झाल्यानंतर आज बुधवारी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी आज किरकोळ वाढीसह सुरु झाले. सेन्सेक्स 201.46 अंकांच्या वाढीसह 54,254.07 वर सुरु झाला, तर 22.1 अंकांच्या वाढीसह 16,196.35वर सुरु झाला. निफ्टी 50 मधील 44 शेअर्समध्ये वाढ झाली, तर 6 शेअर्स घसरणीसह सुरु झाली.
हेही वाचा: म्युच्युअल फंडात 100 रुपयांसह सुरु करा गुंतवणूक, देईल चांगला परतावा...
मंगळवारी सुरुवातीची तेजी गमावत शेअर बाजार लाल चिन्हात बंद झाला. सेन्सेक्स 236.00 अंकांनी अर्थात 0.43 टक्क्यांनी घसरून 54052.61 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 89.50 अंकांनी म्हणजेच 0.55 टक्क्यांनी घसरून 16,125.2 वर बंद झाला.
अर्थव्यवस्थेची मंदावलेली गती आणि वाढत्या व्याजदराच्या चिंतेने जागतिक बाजारपेठेवर परिणाम होत असल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. देशांतर्गत बाजारपेठेतील सर्व महत्त्वाच्या सेक्टर्सवरवर दबाव होता, इंधन दरात कपात आणि स्टील कस्टम ड्युटीमध्ये वाढ झाल्यामुळे वाहन शेअर्समध्ये वाढ झाली.
Web Title: Share Market Latest Updates Sensex And Nifty Opening Status
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..