Share Market : घसरणीसह शेअर बाजाराने 2022 ला दिला निरोप! यावर्षी अदानीचे शेअर्स स्टार परफॉर्मर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

share market

Share Market : घसरणीसह शेअर बाजाराने 2022 ला दिला निरोप! यावर्षी अदानीचे शेअर्स स्टार परफॉर्मर

Share Market Closing : 2022 च्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला आहे. BSE सेन्सेक्स 293 अंकांनी घसरून 61000 च्या खाली 60,840 अंकांवर बंद झाला. तर NSE चा निफ्टी 86 अंकांच्या घसरणीसह 18,105 अंकांवर बंद झाला.

वर्षाच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात धातू, रिअल इस्टेट, मीडिया आणि पीएसयू बँकांच्या शेअर्समध्ये तेजी आहे. पण बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा, एफएमसीजी, ऊर्जा क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

BSE India

BSE India

स्मॉल कॅप आणि मिड कॅप क्षेत्रातील समभाग तेजीत आहेत. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 10 समभाग वाढीसह बंद झाले. तर 20 समभाग तोट्यासह बंद झाले. निफ्टीच्या 50 समभागांपैकी 17 समभाग वाढीसह बंद झाले तर 33 समभाग तोट्यासह बंद झाले.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

पुढील वर्षात हे शेअर्स तेजीत असण्याची शक्यता आहे. यामध्ये भारती एअरटेल (BHARTIARTL), आयशर मोटर्स (EICHERMOT), स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN), ऍक्सिस बँक (AXISBANK), टाटा स्टील (TATASTEEL).

आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB), झिंदाल स्टील (JINDALSTEL), टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR), बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND), हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

हेही वाचा: Free Ration : गरीब कल्याण योजनेत मोठा बदल; आता मिळणार नाही मोफत धान्य

बाजारात घसरण होऊनही बीएसईच्या मार्केट कॅपमध्ये फारसा बदल झालेला नाही. बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप गुरुवारी रु. 282.45 लाख कोटी होते. आज मार्केट कॅप रु. 282.44 लाख कोटी आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.