esakal | शेअर बाजारातील तेजी कायम
sakal

बोलून बातमी शोधा

Share-Market

आजही शेअर बाजारातील तेजी कायम आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी आणि मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स या दोन्ही निर्देशांकात वाढ नोंदवण्यात आली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ११२ अंशांची तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ४५६ अंशांची उसळी  दिसून आली. सेन्सेक्स ३३,७६० अंशांच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. तर निफ्टी ९,९३८ अंशांच्या पातळीच्या वर व्यवहार करतो आहे.

शेअर बाजारातील तेजी कायम

sakal_logo
By
पीटीआय

आजही शेअर बाजारातील तेजी कायम आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी आणि मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स या दोन्ही निर्देशांकात वाढ नोंदवण्यात आली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ११२ अंशांची तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ४५६ अंशांची उसळी  दिसून आली. सेन्सेक्स ३३,७६० अंशांच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. तर निफ्टी ९,९३८ अंशांच्या पातळीच्या वर व्यवहार करतो आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

हॉटेल, रेस्टांरंट, एफएमसीजी,विमानसेवा कंपन्या, यांच्या शेअरच्या किंमतीत वाढ झालेली दिसून आली. २५ मेपासून देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय नागरी उड्डाण मंत्रालयाने जाहीर केला आहे. त्याचा सकारात्मक परिणाम विमानसेवा कंपन्यांच्या शेअरवर दिसून आला आहे. निफ्टी बॅंक आणि निफ्टी ऑटो निर्देशांकात बाजार सुरू झाल्यानंतर तेजी नोंदवण्यात आली. धातू क्षेत्रवगळता इतर सर्वच सेक्टोरेल निर्देशांकांनी तेजी नोंदवली आहे.

देशातील वीजेच्या खपात १४ टक्क्यांची घट;  मे महिन्यात १०३.०२ अब्ज युनिट्सचा वापर

कच्च्या तेलाच्या किंमतींमध्येही तेजी नोंदवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीतसुद्धा वाढ झाली आहे. एमसीएक्सवर कच्चे तेल २७०६ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करते आहे.

रिलायन्स राईट्स इश्यूला जबरदस्त प्रतिसाद

तर डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात मात्र थोडी घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया ०.०१ रुपयांनी घसरला आहे. आंतरराष्ट्रीय चलन बाजारात  डॉलरच्या तुलनेत रुपया ७५.५५ रुपये प्रति डॉलरवर व्यवहार करतो आहे.

* सेन्सेक्स ३३,७०० अंशांच्या पातळीवर
* निफ्टी ९,९०० अंशांच्या पातळीच्या वर 
* निफ्टीमध्ये ११२ अंशांची उसळी
* सेन्सेक्समध्ये ४५६ अंशांची उसळी

loading image
go to top