Manapuram Finance : शेअर्सवर तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, गुंतवणुकीसाठी योग्य वेळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Manapuram Finance : शेअर्सवर तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, गुंतवणुकीसाठी योग्य वेळ

Manapuram Finance : शेअर्सवर तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, गुंतवणुकीसाठी योग्य वेळ

Manapuram Finance : शेअर बाजार सध्या रिकव्हरी मोडवर दिसून येत आहे. या दरम्यान मणप्पुरम फायनान्सच्या शेअर्समध्ये खरेदीचा कल दिसून येत आहे. सध्याच्या किंमतीत गुंतवणूक करण्याची ही सुवर्णसंधी असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. ब्रोकरेज फर्म एडलवाईसने यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी सल्ला दिला आहे. सध्या बीएसईवर त्याची किंमत 94.35 रुपये आहे.

हेही वाचा: Share Market : फोर्ब्स अँड कंपनीच्या स्टॉकचा 6 महिन्यांत 88 टक्के परतावा

देशांतर्गत ब्रोकरेज फर्म एडलवाईसने मणप्पुरम फायनान्समधील गुंतवणुकीसाठी 103 रुपयांचे टारगेट दिले आहे, म्हणजे सध्याच्या किंमतीपेक्षा 9 टक्के जास्त किंमत यात मिळेल. शॉर्ट टर्मसाठी गुंतवणूक करताना 89.5 रुपवांवर स्टॉप लॉस ठेवण्याचा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.

हेही वाचा: Share Market : फोर्ब्स अँड कंपनीच्या स्टॉकचा 6 महिन्यांत 88 टक्के परतावा

मणप्पुरम फायनान्सचे शेअर्स 10 नोव्हेंबर 2021 रोजी गेल्या वर्षी 224.40 रुपयांच्या एका वर्षाच्या उच्चांकावर पोहोचले. मात्र, त्यानंतर त्याची किंमत घसरायला लागली आणि आत्तापर्यंत ती जवळपास 58 टक्क्यांनी घसरली आहे. यावर्षी, 20 जून 2022 ला, तो 52 आठवड्यांच्या विक्रमी नीचांकी 81.50 रुपयांवर घसरला होता, पण त्यानंतर खरेदी वाढली आणि आतापर्यंत ती सुमारे 16 टक्के मजबूत झाली आहे.

हेही वाचा: Share Market : शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 486 तर निफ्टी153 अंकांवर

मणप्पुरम फायनान्स ही एनबीएफसी कंपनी आहे ज्याचे मार्केट कॅप 7,985.73 कोटी आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत तिचा निव्वळ नफा वाढला आहे. जानेवारी-मार्च 2022 मध्ये याने 26.53 कोटी रुपयांचा नफा कमावला होता, जो एप्रिल-जून 2022 च्या पुढील तिमाहीत 29.01 कोटी रुपयांवर पोहोचला होता. मणप्पुरम फायनान्सचा महसूल याच कालावधीत 105.47 कोटींवरून वाढून 110.99 कोटी झाला आहे.

हेही वाचा: Share Market: शेअर बाजारात पडझडीचं सत्र सुरूच; सेन्सेक्स 509 घसरला

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

टॅग्स :Share Market