Share Market : 50 रुपयांपेक्षा स्वस्त शेअर! देणार उत्तम परतावा

शेअर बाजारात खरेदी करण्यासाठी मजबूत स्टॉक निवडला आहे.
Share Market
Share MarketSakal
Summary

शेअर बाजारात खरेदी करण्यासाठी मजबूत स्टॉक निवडला आहे.

Stock to Buy : शेअर बाजारात (Share Market) नुसता नशीब कामाला येत नाही, तर त्यासाठी अभ्यास सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. कारण एखादा शेअर (Share) तुम्हाला कधी पर्यंत कमाई करून देऊ शकतो, याचा अंदाज येणे गरजेचे आहे. नव्याने शेअर बाजारात प्रवेश केलेल्यांना याचा पटकन अंदाज लावता येणे कठीण आहे आणि म्हणूनच शेअर बाजार तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. आज आपल्याला शेअर बाजार तज्ज्ञ संदीप जैन मार्गदर्शन करणार आहेत. आज त्यांनी शॉर्ट टर्म गुंतवणूकदारांसाठी हा शेअर सांगितला आहे. Menon Piston मध्ये गुंतवणूक (Investment) करा असा सल्ला संदीप जैन यांनी दिला आहे.

Share Market
Share Market : शेअर बाजारात 'हॅप्पी इयर एन्डिंग'

संदीप जैन यांच्या मते, ऑटो स्टॉकचा (Auto stock) हा मजबूत स्टॉक शॉर्ट टर्ममध्ये चांगली कमाई करू शकतो. स्टॉक 14 च्या PE मल्टिपलवर ट्रेडिंग करत आहे. CAGR म्हणजेच कंपनीच्या मागील 5 वर्षांच्या नफ्याचा चक्रवाढ वार्षिक वाढीचा दर 16 टक्के आहे.

Menon Piston

- सीएमपी (CMP) - 43.80 रुपये

- टारगेट (Target) - 50/55 रुपये

- कालावधी (Duration) - 6-9 महीने

कंपनीबाबत अधिक माहिती

Menon Piston ही कंपनी 1977 पासून कार्यरत आहे. संदीप जैन यांनी सांगितले की, ही कंपनी मार्केट कॅपच्या आधारावर छोटी आहे, पण अशा कंपन्या मोठी काम करतात. ही कंपनी व्यावसायिक वाहने आणि ट्रॅक्टर बनवते.

Share Market
केमिकल इंडस्ट्रीचा 'हा' शेअर देईल, रग्गड परतावा...जाणून घ्या

गेल्या सप्टेंबर तिमाहीत कंपनीला 2.5 कोटी रुपयांचा नफा झाला होता, मात्र यंदाच्या सप्टेंबर तिमाहीत कंपनीला 5 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. कंपनीमध्ये प्रोमोटर्सची 75 टक्के हिस्सेदारी आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com