मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण; 5300 अब्ज रुपयांचा फटका 

संजय घारपुरे 
Friday, 26 February 2021

दहा महिन्यातील मुंबई शेअर बाजारातील सर्वात मोठी घसरण झाल्याचा चांगलाच फटका गुंतवणुकदारांना बसला आहे. यामुळे झालेले नुकसान 5300 अब्ज रुपये असल्याचे सांगितले जात आहे. हे नुकसान 5 लाख 37 हजार 375.94 कोटी रुपये इतके झाले आहे.

मुंबई / नवी दिल्ली - दहा महिन्यातील मुंबई शेअर बाजारातील सर्वात मोठी घसरण झाल्याचा चांगलाच फटका गुंतवणुकदारांना बसला आहे. यामुळे झालेले नुकसान 5300 अब्ज रुपये असल्याचे सांगितले जात आहे. हे नुकसान 5 लाख 37 हजार 375.94 कोटी रुपये इतके झाले आहे. गुरुवारी शेअर बाजारातील विक्रीनंतर कंपन्याचे एकूण मूल्य 2 कोटी 6 लाख 18 हजार 471.67 कोटी होते, ते शुक्रवारी शेअर बाजारातील वायदे पूर्ण झाले, त्यावेळी त्यांचे एकूण मूल्य 2 कोटी 81 हजार 95.73 कोटी झाले होते. शुक्रवारी 30 शेअरचा बीएसई निर्देशांक 1 हजार 939.32 वरुन खाली येत 49,099.99 वर स्थिरावला. ही 4 मे पासूनची सर्वात मोठी घसरण आहे. तर एनएसईमधील 568.20 निर्दशांकाची घसरण 23 मार्चपासूनची सर्वाधिक आहे. 

शेअर बाजारात भूकंप, 'दलाल स्ट्रीट'साठी आजचा दिवस ठरला 'ब्लॅक फ्रायडे' !

जागतिक परिस्थिती पाहता मार्केटमध्ये हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्‍यता आहे. गुंतवणूकदारांनी बाँडपासून मिळणारे उत्त्पन्न, जागतिक स्तरावरील घडामोडी, महागाई निर्देशांकावर लक्ष ठेवल्यास त्यांना बाजाराची दिशा कळू शकेल. त्याचबरोबर अमेरिकेतील घडामोडींवरही लक्ष ठेवण्याची गरज आहे, असे मोतीलाल ओसवाल फायनाशिंयल सर्व्हिसेसच्या रिटेल रिसर्चचे प्रमुख सिद्धार्थ खेमका यांनी सांगितले. त्याचवेळी त्यांनी उंचावलेल्या शेअर बाजारानंतरही अस्वस्थता असते, त्यामुळे त्यात काहीशी घसरण होतेच, असेही नमूद केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गुंतवणूकदारांसाठी ही खरेदीची चांगली संधी आहे, त्याचवेळी शेअर बाजारातील व्यापाऱ्यांनी खूप काळजीपूर्वक सौदे करण्याची गरज आहे. त्याचबरोबर प्रत्येक स्टॉकचा स्वतंत्रपणे विचारही महत्त्वाचा आहे. दरम्यान, या कोसळलेल्या शेअर बाजाराचा बॅंकिंग क्षेत्राबरोबरच वित्त तसेच टेलिकॉम क्षेत्रासही चांगलाच मोठा फटका बसला आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: share market news bombay stock exchange drops tremendous loss