Share Market : लवकरच येतोय मॅनकाईंड फार्माचा IPO, अधिक जाणून घेऊयात..

कंपनीचा आयपीओ 5587 कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकतो असे सुत्रांकडून समजतंय.
Share Market
Share Marketesakal

मॅनफोर्स कंडोम आणि प्रेग्नेंसी किट प्रेगा न्यूज विकणारी कंपनी मॅनकाइंड फार्मा (Mankind Pharma) आयपीओ लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याचे सुत्रांकडून समजते आहे. मॅनकाइंड फार्माने (Mankind Pharma) बाजार नियामक सेबीकडे ड्राफ्ट प्रॉस्पेक्स्ट्स दाखल केला आहे. प्रायव्हेट इक्विटी फर्म क्रिसकॅपिटलची (ChrysCapital) यात गुंतवणूक आहे.

कंपनीचा आयपीओ 5587 कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकतो असे सुत्रांकडून समजतंय. जर मॅनकाइंडचा आयपीओ या आकारात आला तर तो फार्मा क्षेत्रातला दुसरा सर्वात मोठा आयपीओ ठरू शकतो. या क्षेत्रातील सर्वात मोठ्या आयपीओचा विक्रम ग्रँड फार्माच्या नावे (Gland Pharma) आहे, त्यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये 6927 कोटीचा आयपीओ आणला होता.

Share Market
Tourism : ऑक्टोबरमधील सणांचा आनंद घ्यायचा असेल तर 'या' खास ठिकाणी भेट द्या..

कंपनीने ड्राफ्ट फाईल दाखल केल्याचे सुत्रांकडून समजतंय. त्यांच्याकडे रोख जास्त आहे आणि त्यामुळे कंपनी चांगल्या मार्जिनसाठी ओटीसी उत्पादनांमध्ये विस्तार करण्याचा विचार करत आहे. आयपीओ ऑफर फॉर सेल असू शकतो. इतर फार्मा कंपन्यांच्या तुलनेत मॅनकाइंड फार्माचा भारतात सर्वाधिक व्यवसाय आहे, ज्यामुळे ती गुंतवणूकदारांना आकर्षित करू शकते.

मॅनकाइंड फार्मा (Mankind Pharma) प्रिस्क्रिप्शन मेडिसिन्स, ओटीसी प्रॉडक्ट्स आणि पशुवैद्यकीय औषधे तयार करते. त्याच्या टॉप ब्रँड्समध्ये प्रेगा न्यूज, मॅनफोर्स, अनवॉन्टेड-21, एक्नेस्टार, रिंगआउट, गॅस-ओ-फास्टचा समावेश आहे. कंपनीत 14 हजारांहून अधिक कर्मचारी काम करतात आणि तिचा व्यवसाय अमेरिका, श्रीलंका, कंबोडिया, केनिया, कॅमरून, म्यानमार आणि फिलीपिन्ससह 34 देशांमध्ये आहे.

Share Market
Health : वारंवार शरीरातील अवयवांना सूज येत असेल तर 'हे' घरगुती उपाय ट्राय करा

2021 च्या आर्थिक वर्षात कंपनीने 6385 कोटी रुपयांचा महसूल मिळवला होता. 2020-21 या आर्थिक वर्षात कंपनीला 1293 कोटी रुपयांचा निव्वळ नफामिळाला होता. कंपनीचे पोंटा साहिब (हिमाचल प्रदेश), सिक्कीम, विझाग आणि राजस्थानसह 21 ठिकाणी प्लांट्स आहेत.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com