HPCL भागधारकांना देणार बोनस शेअर!

sakalmoney.com
शनिवार, 27 मे 2017

हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन अर्थात एचपीसीएलने भागधारकांना बोनस शेअर देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने दहा रुपये दर्शनी मूल्य असणाऱ्या दोन शेअर्ससाठी दहा रुपये दर्शनी मूल्य असलेला एक बक्षीस (बोनस) शेअर देण्याची शिफारस केली आहे.

नवी दिल्ली : हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन अर्थात एचपीसीएलने भागधारकांना बोनस शेअर देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने दहा रुपये दर्शनी मूल्य असणाऱ्या दोन शेअर्ससाठी दहा रुपये दर्शनी मूल्य असलेला एक बक्षीस (बोनस) शेअर देण्याची शिफारस केली आहे.

याशिवाय, भागधारकांना सरलेल्या आर्थिक वर्षात प्रतिशेअर 1.10 अंतिम लाभांश देण्याचा कंपनीचा विचार आहे. अशाप्रकारे कंपनी एकुण 3,668 कोटी रुपयांचा लाभांश देणार आहे.

हिंदुस्थान पेट्रोलियमला सरलेल्या तिमाहीत 1,819 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. कंपनीच्या तिमाही नफ्यात सुमारे 31 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली असून अगोदरच्या आर्थिक वर्षातील याच तिमाहीत कंपनीला 1,388 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. देशांतर्गत विक्रीत वाढ, कार्यान्वयन क्षमतेत सुधारणा आणि अन्य काही कारणांमुळे नफा वाढल्याचे कंपनीने सांगितले आहे.

गेल्या संपूर्ण आर्थिक वर्षात(2015-16) कंपनीचा नफा 67 टक्क्यांनी वधारुन 6,209 कोटी रुपयांवर पोचला आहे.

ताज्या बातम्याः

Web Title: Share market news in Marathi HPCL Bonus share