'सन फार्मा'ला रु.1,224 कोटींचा नफा; रु.3.5 लाभांश

sakalmoney.com
शनिवार, 27 मे 2017

फार्मा क्षेत्रातील प्रमुख भारतीय कंपनी सन फार्माला मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत 1,223.71 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. कंपनीच्या तिमाही नफ्यात 13.59 टक्क्यांची घसरण झाली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने प्रतिशेअर 3.5 रुपयांचा लाभांश देण्याची शिफारस केली आहे.

नवी दिल्ली: फार्मा क्षेत्रातील प्रमुख भारतीय कंपनी सन फार्माला मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत 1,223.71 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. कंपनीच्या तिमाही नफ्यात 13.59 टक्क्यांची घसरण झाली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने प्रतिशेअर 3.5 रुपयांचा लाभांश देण्याची शिफारस केली आहे.

सरलेल्या आर्थिक वर्षातील जानेवारी ते मार्चदरम्यान कंपनीने एकुण 6,825.16 कोटी रुपयांची विक्री केली आहे. अगोदरच्या आर्थिक वर्षातील याच तिमाहीत 7,415.98 कोटी रुपयांच्या विक्रीवर 1,416.13 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. याशिवाय, गेल्या संपुर्ण आर्थिक वर्षात कंपनीला 6,964 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. त्यात 53 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. दरम्यान, कंपनीचे कार्यान्वयन उत्पन्न 30,264 कोटी रुपयांवर पोचले आहे.

ताज्या बातम्याः

Web Title: Share market news in marathi Sun Pharma booked profit