शेअर बाजाराची विक्रमी सुरुवात, नव्या शिखरावर सेन्सेक्स

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 28 December 2020

सुरुवातीच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स 307.20 अंकाच्या उसळीसह 47280.74 स्तरावर पोहोचला होता आणि 47310.76 अंकाच्या नव्या शिखराला स्पर्श केला होता. 

मुंबई- शेअर बाजार पुन्हा एकदा नव्या उंचीवर पोहोचला आहे. सेन्सेक्सने सोमवारी एका नव्या विक्रमाला गवसणी घालत 180.05 अकांच्या वाढीसह 47153.59 स्तरावर सुरु झाला. तर निफ्टीची सुरुवातही चांगली झाली. यापूर्वी 21 डिसेंबरला सेन्सेक्स ऑल टाइम हाय 47055.69 स्तरावर पोहोलचला होता. सुरुवातीच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स 307.20 अंकाच्या उसळीसह 47280.74 स्तरावर पोहोचला होता आणि 47310.76 अंकाच्या नव्या शिखराला स्पर्श केला होता. तर निफ्टी 13850.95 स्तरावर पोहोचला होता. 

संपूर्ण वर्षभर बाजारात व्यापक चढ-उतार दिसून आला. एकीकडे बाजार ऐतिहासिक खालच्या स्तरावर गेला. तर दुसरीकडे जोरदार तेजीही दिसून आली. कधीतर एकाच दिवशी जबरदस्त चढ-उतार दिसून आला. बाजारातील या घडामोडींमुळे छोटे आणि नवे गुंतवणूकदारही हैराण झाले. मार्चच्या अखेरीपर्यंत रसातळाला गेलेला सेन्सेक्स आणि निफ्टी पुन्हा उसळी घेईल असे कोणालाही वाटले नव्हते. एकंदरात 2020 मधील बाजारातील चढ-उतार कल्पनेपलीकडचा आहे. 

मार्चमध्ये तळ गाठल्यानंतर 8 ऑक्टोबरला सेन्सेक्स 40 हजार पार करुन 40182 वर पोहोचला होता. तर पाच नोव्हेंबरला सेन्सेक्स 41340 वर बंद झाला होता. 10 नोव्हेबर रोजी इंट्राडेमध्ये इंडेक्स स्तरावर 43227 वर पोहोचला होता. तर 18 नोव्हेंबरला 44180 आणि 4 डिसेंबरला 45000 चा आकडा पार केला. 9 डिसेंबरला सेन्सेक्स पहिल्यांदा 46000 च्या वर 46103.50 च्या स्तरावर बंद झाला. 14 डिसेंबरला सेन्सेक्स 46284.7 वर उघडला. तर 21 डिसेंबरला सेन्सेक्स ऑल टाइम हाय 47055.69 च्या स्तरावर पोहोचला. आज म्हणजेच 28 डिसेंबरला सेन्सेक्स 47354.71 च्या विक्रमी स्तरावर पोहोचला आहे.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Share market open with new record sensex opens at high