Share Market Opening : दोन दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'या' बँकिंग आणि आयटी शेअर्समध्ये तेजी

आज देशांतर्गत शेअर बाजार तेजीत आहे. सेन्सेक्स-निफ्टी चांगल्या स्थितीत व्यवहार करत आहेत.
Share Market
Share Market Sakal
Updated on

Share Market Opening : आज देशांतर्गत शेअर बाजार तेजीत आहे. सेन्सेक्स-निफ्टी चांगल्या स्थितीत व्यवहार करत आहेत. सेन्सेक्स 60,300 च्या वर ट्रेडिंग सुरू आहे आणि निफ्टी 17,750 च्या वर आला आहे.

प्री-ओपनिंगमध्ये लाल चिन्हात व्यवहार होत असले तरी शेअर बाजाराची सुरुवात हिरव्या चिन्हातच झाली आहे.

आजच्या बाजाराच्या सुरुवातीला बीएसई सेन्सेक्स 46.95 अंकांच्या वाढीसह म्हणजेच 60,332.99 व्यवहार करत आहे. दुसरीकडे, NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 28.80 अंकांनी म्हणजेच 0.16 टक्क्यांच्या वाढीसह 17,750.30 च्या पातळीवर उघडला.

BSE India
BSE IndiaSakal

सेन्सेक्समधील 30 पैकी केवळ 8 समभागांमध्ये घसरण होत असून 22 समभाग तेजीसह व्यवहार करत आहेत. याशिवाय निफ्टीच्या 50 पैकी 37 समभाग वाढीच्या हिरव्या चिन्हासह व्यवहार करत आहेत आणि 13 समभाग घसरण नोंदवत आहेत.

सेन्सेक्सचे 'हे' शेअर तेजीत :

एचसीएल टेकमध्ये 1.41 टक्के आणि टीसीएसमध्ये 1.22 टक्के वाढ झाली आहे. इन्फोसिसमध्ये 1.15 टक्के आणि विप्रोमध्ये 1.05 टक्के वाढ दिसून येत आहे.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

याशिवाय एसबीआय, टेक महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी, बजाज फिनसर्व्ह, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, एशियन पेंट्स, अॅक्सिस बँक, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, नेस्ले, टायटन, इंडसइंड बँक, एल अँड टी, कोटक महिंद्रा बँक आणि एचयूएल यांचा समावेश होता. च्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे

Share Market
Layoffs 2023 : कर्मचारी कपात सुरूच! आता Zoom कंपनीही देणार कर्मचाऱ्यांना नारळ; कारण...

'या' शेअर्समध्ये घसरण :

पॉवरग्रिड, एनटीपीसी, सिप्ला, सनफार्मा, बीपीसीएल, डाबर, टाटा, हीरो मोटर, बजाज ऑटो या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.