Share Market Opening : जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; फार्मा कंपन्यांच्या 'या' शेअर्समध्ये तेजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

share market

Share Market Opening : जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; फार्मा कंपन्यांच्या 'या' शेअर्समध्ये तेजी

Share Market Opening : जागतिक संकेतांमुळे दोन दिवसांच्या मजबूत वाढीनंतर गुरुवारी व्यापार सत्रात भारतीय शेअर बाजारात घसरण सुरू झाली.

BSE सेन्सेक्स 125 अंकांनी घसरून 60,920 वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 32 अंकांनी 18,132 अंकांवर उघडला.

जागतिक बाजारपेठेत घसरण :

बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात अमेरिकन शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला. डाऊ जोन्स 1.81 टक्क्यांनी आणि नॅस्डॅक 1.24 टक्क्यांनी घसरून बंद झाला. त्यानंतर आशियाई बाजार घसरणीसह व्यवहार करत आहेत. निक्केई, स्ट्रेट टाइम्स, हँगसेंग घसरणीसह व्यापार करत आहे.

हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

बाजारात फक्त फार्मा क्षेत्रातील समभाग तेजीत आहेत. पण बँकिंग, आयटी, ऑटो, एफएमसीजी, इन्फ्रा, एनर्जी रिअल इस्टेट क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

हेही वाचा: Adani Group News : अदानी समूहाचा काँग्रेसशासित सरकारसोबत मोठा करार; 'या' कंपनीतील 50% हिस्सा...

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्येही घसरण होऊन व्यवहार सुरू झाले आहेत. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 9 समभाग वाढीने तर 21 समभाग तोट्याने उघडले. तर निफ्टीच्या 50 समभागांपैकी 18 समभाग तेजीसह तर 32 समभाग घसरणीसह व्यवहार करत आहेत.

आजच्या ट्रेडिंग सत्रात HDFC Life 1.34%, Axis Bank 1.19%, Cipla 0.38%, IndusInd Bank 0.36%, UPL 0.33%, Asian Paints 0.29%, Sun Pharma 0.24%, BPCL 0.20% हे शेअर्स तेजीमध्ये आहेत.

अदानी एंटरप्रायझेस 2.15 टक्के, हिंदाल्को 1.90 टक्के, कोटक महिंद्रा 1.34 टक्के, टायटन 1.05 टक्के, विप्रो 0.95 टक्के, लार्सन 0.92 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 0.86 टक्के हे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.

बेंचमार्क निर्देशांकात फॉलोअप खरेदीमुळे बाजारात चांगली तेजी दिसून आल्याचे एंजेल वनचे ओशो कृष्णन म्हणाले. तांत्रिक दृष्टिकोनातून, निफ्टी डेली चार्टवर त्याच्या सर्व इएमएवर ट्रेड करत आहे, जे बाजारासाठी चांगले लक्षण आहे.

आता निफ्टीने 18200 ची पातळी ओलांडून ताकद दाखवली तर त्यात आणखी तेजी येऊ शकते. दुसरीकडे खाली निफ्टीला पहिला सपोर्ट 18050-18100 आणि 18000 वर मोठा सपोर्ट दिसत आहे.

दुसरीकडे, जर निफ्टी 18200-18250 च्या वर जाण्यात यशस्वी झाला तर तो 18400-1850 च्या रेंजमध्ये प्रवेश करेल.