Share Market: अमेर‍िकन बाजारातील परिणामांमुळे शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 578 अंकांनी वधारला

आज शेअर बाजारातील 23 शेअरमध्ये तेजी
Share Market: अमेर‍िकन बाजारातील परिणामांमुळे शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 578 अंकांनी वधारला
sakal

शेअर मार्केटमध्ये या आठवड्यात चांगली तेजी दिसून आली आहे. तर आजही शेअर बाजारात मोठी उसळी दिसून येत आहे. शेअर बाजारात सेन्सेक्समध्ये 578 अंकांची वाढ दिसून आली तर निफ्टीमध्ये 194 अंकांची वाढ दिसून आली. आज सेन्सेक्स 0.98 टक्क्यांच्या तेजीसह 59,719 वर सुरू झाला तर निफ्टी 1.10 टक्क्यांच्या तेजीसह 17,816 वर सुरू झाला आहे. आज शेअर बाजारातील 23 शेअरमध्ये चांगली तेजी असून 27 शेअर घसरणीसह व्यवहार करत आहेत. काल दिवसभरात शेअर बाजारात चांगली तेजी दिसून आली.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?
सलग दुसऱ्या सत्रात रिलीफ रॅली सुरूच असल्याचे श्रीकांत चौहान यांनी सांगितले. प्रत्येक शॉर्ट टर्मच्या करेक्शननंतर गुंतवणूकदारांना भारतीय स्टॉक गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत असल्याचे हे संकेत आहे. अनिश्चिततेच्या काळात भारतीय अर्थव्यवस्था  चांगली कामगिरी करत असल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत असल्याचे ते म्हणाले.

निफ्टीने 20-दिवसांच्या SMA जवळ (सिंपल मूव्हिंग एव्हरेज) हॅमर कॅंडलस्टिक फॉर्मेशन तयार केले आहे. बाजारासाठी हा नेगिटीव्ह संकेत आहे. त्यामुळे निफ्टीमध्ये शॉर्ट टर्म सपोर्ट 17500 वरून 17700 वर सरकला आहे. जर इंडेक्स 17700 च्या खाली गेला, तर विक्रीच्या दबावाखाली 17600-17500 च्या पातळीवर पुढे सरकू शकते. दुसरीकडे, निफ्टी 17700 च्या वर गेल्यास, इंडेक्स पुन्हा 17950-17800 च्या पातळीला स्पर्श करू शकतो.

निफ्टी खाली गेल्यास, इंडेक्स पुन्हा 17400-17500 च्या सपोर्ट झोनला स्पर्श करू शकतो असे शेअरखानचे गौरव रत्नपारखी म्हणाले. जर हा झोन तुटला तर निफ्टी 17200 पर्यंत घसरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, जर निफ्टी वर जाताना दिसला तर 17920-17950 च्या दरम्यान नियर टर्म रेझिस्टन्स झोनमध्ये येईल. निफ्टी या झोनमध्ये अडकलेला दिसतो असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com