Share Market Opening Update: शेअर बाजारात परिस्थिति 'जैसे थे' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Share Market Update

Share Market Opening Update: शेअर बाजारात परिस्थिति 'जैसे थे'

शेअर बाजारात सोमवारी घसरण दिसून आली त्यानंतर शेअर बाजारासाठी मंगळवार आणि आजचा दिवस आश्वासक सुरुवात घेऊन आला आहे. आज सुरवतीच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी दोघांनीही चांगली भरारी घेतली असल्याचे दिसून येत आहे. शेअर बाजाराची परिस्थिति कालप्रमाणेच दिसून येत आहे. सेन्सेक्स 150 अंकांच्या वाढीसह 61 हजार 516 च्या पातळीवर उघडला आहे. तर, निफ्टी 30 अंकांच्या तेजीसह 18 हजार 272 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आज सकाळच्या सत्रात 37 शेअर तेजीत असून 13 शेअर घसरणीसह व्यवहार करत आहेत. काल शेअर बाजारात घसरण दिसून आली होती.

शेअर बाजारात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेली घसरण मंगळवारी अखेर थांबली. बाजाराला पीएसयू बँकांचा चांगला पाठिंबा मिळाला. तरी, पॉवर आणि रियल्टी शेअर्समध्ये विक्रीमुळे बाजाराची वाढ मर्यादित राहिली.

मंगळवारी व्यवहाराअंती सेन्सेक्स 274.12 अंकांच्या म्हणजेच 0.45 टक्क्यांच्या वाढीसह 61418.96 अंकांवर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 84.20 अंकांच्या म्हणजेच 0.46 टक्क्यांच्या वाढीसह 18244.20 च्या पातळीवर बंद झाला. निफ्टी पीएसयू बँक निर्देशांकात सर्वाधिक 1.6 टक्क्यांची वाढ झाली. त्याच वेळी, एफएमसीजी, आयटी आणि मेटल निर्देशांकात 0.5 टक्के वाढ झाली आहे.

हे ही वाचा: Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

तीन दिवसांनंतर बाजारात दिलासादायक तेजी दिसून आल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. बाजाराला चांगल्या जागतिक संकेतांचा सपोर्ट मिळाल्याचे ते म्हणाले. चीनमधील कोविड लॉकडाऊनचा जागतिक विकासाच्या अंदाजावर नकारात्मक परिणाम झाला आहे. त्याच वेळी, यूएस फेडच्या कडक धोरणांच्या वाढत्या शक्यतांमुळे एफआयआयची खरेदी कमी झाली आहे.

दुसरीकडे निफ्टी शॉर्ट टर्म कंसोलिडेशन मोडमध्ये गेल्याचे शेअर खानचे गौरव रत्न पारखी म्हणाले. आणखी एक किंवा दोन आठवडे हा ट्रे़ंड चालू असेल. या कंसोलिडेशनदरम्यान निफ्टी वर आणि खाली दोन्ही बाजूने स्विंग करू शकतो. यावेळी बाजारात विक्री होण्याची दाट शक्यता आहे. निफ्टी शॉर्ट टर्ममध्ये 18,450 च्या रेंजमध्ये कंसोलिडेट होऊ शकतो.

हेही वाचा: बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

इंडसइंड बँक (INDUSINDBK)
जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)
एनटीपीसी (NTPC)
अल्ट्राटेक सिमेंट (ULTRACEMCO)
एटडीएफसी लाईफ (HDFCLIFE)
श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SRTRANSFIN)
झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)
ट्रेंट (TRENT)
भारत फोर्ज (BHARATFORG)
पर्सिस्टंट (PERSISTENT)