बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

यावेळी बाजारात विक्री होण्याची दाट शक्यता आहे. निफ्टी शॉर्ट टर्ममध्ये 18,450 च्या रेंजमध्ये कंसोलिडेट होऊ शकतो.
pre analysis of share market
pre analysis of share marketsakal

शेअर बाजारात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेली घसरण मंगळवारी अखेर थांबली. बाजाराला पीएसयू बँकांचा चांगला पाठिंबा मिळाला. तरी, पॉवर आणि रियल्टी शेअर्समध्ये विक्रीमुळे बाजाराची वाढ मर्यादित राहिली.

मंगळवारी व्यवहाराअंती सेन्सेक्स 274.12 अंकांच्या म्हणजेच 0.45 टक्क्यांच्या वाढीसह 61418.96 अंकांवर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 84.20 अंकांच्या म्हणजेच 0.46 टक्क्यांच्या वाढीसह 18244.20 च्या पातळीवर बंद झाला. निफ्टी पीएसयू बँक निर्देशांकात सर्वाधिक 1.6 टक्क्यांची वाढ झाली. त्याच वेळी, एफएमसीजी, आयटी आणि मेटल निर्देशांकात 0.5 टक्के वाढ झाली आहे.

pre analysis of share market
Share Market: शेअर बाजारात पडझडीचं सत्र सुरू, सेन्सेक्स 501 अंकानी गडगडला

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

तीन दिवसांनंतर बाजारात दिलासादायक तेजी दिसून आल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. बाजाराला चांगल्या जागतिक संकेतांचा सपोर्ट मिळाल्याचे ते म्हणाले. चीनमधील कोविड लॉकडाऊनचा जागतिक विकासाच्या अंदाजावर नकारात्मक परिणाम झाला आहे. त्याच वेळी, यूएस फेडच्या कडक धोरणांच्या वाढत्या शक्यतांमुळे एफआयआयची खरेदी कमी झाली आहे.

दुसरीकडे निफ्टी शॉर्ट टर्म कंसोलिडेशन मोडमध्ये गेल्याचे शेअर खानचे गौरव रत्न पारखी म्हणाले. आणखी एक किंवा दोन आठवडे हा ट्रे़ंड चालू असेल. या कंसोलिडेशनदरम्यान निफ्टी वर आणि खाली दोन्ही बाजूने स्विंग करू शकतो. यावेळी बाजारात विक्री होण्याची दाट शक्यता आहे. निफ्टी शॉर्ट टर्ममध्ये 18,450 च्या रेंजमध्ये कंसोलिडेट होऊ शकतो.

pre analysis of share market
Stock Market Closing : सेन्सेक्स 59,959 वर बंद, 'या' क्षेत्रामध्ये झाली घसरण

निफ्टीची सुरुवात सपाट झाल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. पण शेवटी चांगली वाढ दिसून आली. डेली चार्टवरील बुलिश हरामी पॅटर्न रिकव्हरीची चिन्हे दाखवत आहे. आता पुढे निफ्टीला साइड वेजमधून सकारात्मक व्यवसाय करताना पाहू शकतो. पुढे जाऊन, निफ्टीला पहिला सपोर्ट 18,200 वर आहे. जर हा सपोर्ट तुटला तर निफ्टी 18100 च्या दिशेने जाताना दिसेल. वरच्या बाजूला पहिला रझिस्टंस 18300 वर आणि दुसरा 18450 वर दिसत आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

इंडसइंड बँक (INDUSINDBK)
जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)
एनटीपीसी (NTPC)
अल्ट्राटेक सिमेंट (ULTRACEMCO)
एटडीएफसी लाईफ (HDFCLIFE)
श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SRTRANSFIN)
झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)
ट्रेंट (TRENT)
भारत फोर्ज (BHARATFORG)
पर्सिस्टंट (PERSISTENT)


नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com