Share Market Opening Update: शेअर बाजारात पुन्हा ‘अच्छे दिन’, सेन्सेक्स, निफ्टी तेजीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Today's Stock Market Updates | Share Market News

Share Market Opening Update: शेअर बाजारात पुन्हा ‘अच्छे दिन’, सेन्सेक्स, निफ्टी तेजीत

शेअर बाजारात आज सुरवतीच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी दोघांनीही चांगली भरारी घेतली असल्याचे दिसून येत आहे. मागील दोन दिवसात शेअर बाजाराची परिस्थिति एकसारखी दिसून आली होती. दरम्यान आज सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 250 अंकांच्या वाढीसह 61 हजार 754 च्या पातळीवर उघडला आहे. तर, निफ्टी 75 अंकांच्या तेजीसह 18 हजार 340 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आज सकाळच्या सत्रात 40 शेअर तेजीत असून 9 शेअर घसरणीसह व्यवहार करत आहेत.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

बाजार वाढीसह खुला झाला पण ही वाढ पुढच्या लेव्हलपर्यंत जाऊ शकली नसल्याचे शेअरखानचे गौरव रत्नपारखी म्हणाले. वरच्या बाजूला आवर्ली बोलिंजर बँडने स्पीड ब्रेकर म्हणून काम केले आणि बाजारातील तेजी थांबवली. आता निफ्टीमध्ये आपण 18100-18000 ची पातळी पाहू शकतो. पण हे करेक्शन एक शॉर्ट टर्म कंसोलिडेशनचा एक भाग असेल. हे कंसोलिडेशन 18000-18450 दरम्यान होऊ शकते. निफ्टीला 18300-18325 या झोनमध्ये रझिस्टंसचा सामना करावा लागत आहे.

दिवसभरातील चढ-उतारांदरम्यान बाजार एका छोट्या श्रेणीत फिरताना दिसल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. चीनच्या लॉकडाऊनच्या बातम्यांचा बाजारावर परिणाम झाला. तांत्रिक दृष्टिकोनातून, निफ्टीने रिव्हर्सलनंतर एक लहान बियरीश कँडल  तयार केली आहे, जे अनिश्चिततेचे संकेत देत आहेत.

हेही वाचा: Share Market : आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म ?

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)
एचडीएफसी लाईफ (HDFCLIFE)
जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)
बजाज फायनान्स (BAJFINANCE)
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)
भारतीय कंटनेर निगम (CONCOR)
एबीबी इंडिया लिमिटेड (ABB)
ए यू बँक (AUBANK)
अशोक लेलँड (ASHOKLEY)
टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)

हे ही वाचा: Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?