Share Market Opening : आर्थिक सर्वेक्षणापूर्वी शेअर बाजारात तेजी; अदानींच्या 'या' शेअर्समध्ये मोठी तेजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

share market

Share Market Opening : आर्थिक सर्वेक्षणापूर्वी शेअर बाजारात तेजी; अदानींच्या 'या' शेअर्समध्ये मोठी तेजी

Share Market Opening : आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि त्यासोबतच 2023-24 या आर्थिक वर्षाचे आर्थिक सर्वेक्षण देखील आज सादर केले जाईल.

आज बाजारासाठी चांगली चिन्हे दिसत आहेत आणि देशांतर्गत बाजार तेजीसह उघडण्यात यशस्वी झाले आहेत.

आजच्या बाजाराच्या सुरुवातीला बीएसई सेन्सेक्स 270.42 अंकांच्या म्हणजेच 0.45 टक्क्यांच्या वाढीसह 59,770 वर उघडला. NSE चा निफ्टी 82.50 अंकांनी म्हणजेच 0.47 टक्क्यांच्या वाढीसह 17,731 वर उघडला.

BSE India

BSE India

सेन्सेक्समधील 30 पैकी केवळ 9 समभाग तेजीत आहेत आणि त्यातील 11 समभाग घसरणीसह व्यवहार करत आहेत.

निफ्टीच्या 50 समभागांपैकी 31 समभाग घसरत आहेत आणि 19 समभाग वाढीसह व्यवहार करत आहेत.

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

'या' शेअर्समध्ये तेजी :

पॉवर ग्रिड, एम अँड एम, मारुती सुझुकी, भारती एअरटेल, एसबीआय, रिलायन्स इंडस्ट्रीज, अल्ट्राटेक सिमेंट, अदानी एंटरप्राइजेज आणि टायटन यांच्या सेन्सेक्स समभागांमध्ये वाढ होत आहे.

'या' शेअर्समध्ये घसरण :

सेन्सेक्सच्या ज्या समभागांमध्ये घसरण दिसून येत आहे, त्यात टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक, , आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, कोटक बँक, टाटा स्टील, विप्रो आणि एचयूएल यांच्या समभागांमध्ये कमजोरी आहे.

NPC, ITC, बजाज फिनसर्व्ह, सन फार्मा, इंडसइंड बँक, एशियन पेंट्स, इन्फोसिस, बजाज फायनान्स, नेस्ले, TCS, L&T, HCL टेक, टेक महिंद्रा देखील लाल रंगात व्यवहार करत आहेत.

अदानी समूहाच्या शेअर्सची विक्री आजही सुरू आहे. अदानी ग्रीन एनर्जी, अदानी टोटल गॅस, अदानी विल्मर, अदानी पॉवर या समभागांनी लोअर सर्किटला धडक दिली. अदानी एंटरप्रायझेस तेजीत आहे.

आज या FPO चा शेवटचा दिवस आहे. अबू धाबी IHC ने 400 दशलक्ष डॉलर गुंतवणुकीची घोषणा केली आहे. निकालानंतर बीपीसीएलमध्ये 4 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.आज कोल इंडिया, पॉवरग्रीड, सन फार्मा, एसीसी, इंडियन ऑइल या कंपन्यांचे निकाल येतील.