बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स दाखवतील चमक?

महागाईच्या चिंतेनं मध्यवर्ती बँका आता अधिक व्याजदर वाढवू शकतात, ज्यामुळे वाढ आणि मार्जिनवर नकारात्मक परिणाम होईल असे श्रीकांत चौहान म्हणाले.
share market
share marketgoogle

शेअर बाजाराने आठवड्याची सुरुवात मोठ्या घसरणीने केली आहे. सोमवारी सेन्सेक्स, निफ्टी 2.5 टक्क्यांनी घसरले. बँक निफ्टीही 3 टक्क्यांहून अधिक घसरले. मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही कपात झाली आहे.

फेड बैठकीपूर्वी बाजारात विक्री दिसून आली. बीएसईच्या सर्व सेक्टर इंडेक्समध्ये घसरण झाली आहे. आयटी, मेटल, बँकिंग शेअर्सची जोरदार विक्री झाली आहे. रियल्टी, ऑटो, फार्मा शेअर्समध्येही घसरण पाहायला मिळाली. ऊर्जा, एफएमसीजी आणि ऊर्जा शेअर्सवरही दबाव होता.

share market
बँकेत बचत खाते असणाऱ्या प्रत्येकालाच माहीत असाव्यात या ५ गोष्टी

सेन्सेक्स 1,457 अंकांनी घसरून 52847 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 427 अंकांनी घसरून 15774 वर बंद झाला. निफ्टी बँक 1078 अंकांनी घसरून 33405 वर बंद झाला आहे. मिडकॅप 798 अंकांनी घसरून 26778 वर बंद झाला आहे. निफ्टीचे 50 पैकी 48 शेअर्स घसरले. सेन्सेक्समधील 30 पैकी 29 शेअर्समध्ये विक्री दिसून आली. निफ्टी बँकेच्या सर्व 12 शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

share market
IRCTC शेअर्समध्ये घसरण, आता गुंतवणूक करावी का?

आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती ?

सोमवारी बाजारात मोठी घसरण झाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. बाजारातील चौफेर घसरणीमुळे सेन्सेक्स-निफ्टी त्यांच्या महत्त्वाच्या पातळीच्या खाली घसरले. महागाईच्या चिंतेनं मध्यवर्ती बँका आता अधिक व्याजदर वाढवू शकतात, ज्यामुळे वाढ आणि मार्जिनवर नकारात्मक परिणाम होईल असेही ते म्हणाले.

जर निफ्टी 15,700 च्या खाली बंद झाला तर बाजारात आणखी घसरण दिसेल. शॉर्ट टर्ममध्ये निफ्टी 15,500-15,400 पर्यंत जाताना दिसू शकतो. अशा परिस्थितीत, 15,700 च्या खाली लाँग पोझिशन्स कमी करा असा सल्ला त्यांनी दिला. दुसरीकडे, जर बँक निफ्टी 33,500 च्या खाली घसरला तर तो 32,000 वर जाऊ शकतो.

share market
गुंतवणूकदारांना बुडवण्यात LIC चा IPO आशियात ठरला नंबर वन

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)

बजाज फायनान्स (BAJAJFINANCE)

टाटा मोटर्स (TATAMOTORS)

इंडसइंड बँक (INDUSINDBANK)

हिन्दाल्को (HINDALCO)

एल अँड टी (LTTS)

एम फॅसिस (MPHASIS)

पर्सिस्टंट (PERSISTENT)

गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

टाटा पॉवर (TATAPOWER)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com