शेअर बाजार सुरु होण्यापूर्वी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील जबरदस्त कामगिरी

गुरुवारी सेन्सेक्स-निफ्टी 1% पेक्षा जास्त वाढीसह बंद झाले.
Share Market Todays update
Share Market Todays updateSakal

Best Stocks to buy today 29 April 2022: गुरुवारी सेन्सेक्स-निफ्टी 1% पेक्षा जास्त वाढीसह बंद झाले, गुरुवारी बीएसईचे सर्व सेक्टरल इंडेक्स तेजीत होते. एफएमसीजी, पॉवर, पीएसईच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. आयटी, इन्फ्रा, बँकिंग शेअर्समध्येही खरेदी झाली.

गुरुवारच्या व्यवसायात बाजाराची सुरुवात हिरव्या चिन्हात झाली. दिवस जसजसा पुढे जात होता, तसतसा बाजार तेजीत दिसत होता आणि व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स-निफ्टी 1 टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद होण्यात यशस्वी झाला.

Share Market Todays update
Share Market: शेअर बाजार दमदार! सेन्सेक्स 701 अंकानी वधारला तर निफ्टी 17,245 वर बंद

बीएसईचे सर्व सेक्टरल इंडेक्स तेजीत होते तेजीत होते. एफएमसीजी, पॉवर, पीएसई समभाग सर्वाधिक वाढले. आयटी, इन्फ्रा, बँकिंग शेअर्समध्येही खरेदी झाली. बीएसई मिडकॅप इंडेक्स 0.31 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला तर स्मॉलकॅप इंडेक्स 0.08 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला.

व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 701.67 अंकांच्या म्हणजेच 1.23 टक्क्यांच्या वाढीसह 57,521.06 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 206.65 अंकांच्या अर्थात1.21 टक्क्यांच्या वाढीसह 17245.05 वर बंद झाला.

Share Market Todays update
सामान्यांचं कंबरडं मोडणाऱ्या कोरोनाने IT कंपन्यांना केलं मालामाल

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

एचडीएफसी लाईफ (HDFCLIFE)

हिंदुस्थान युनिलिव्हर (HINDUNILVR)

एसबीआय लाईफ (SBILIFE)

यूनायटेड फॉस्फरस लिमिटेड (UPL)

एशियन पेन्ट्स (ASIANPAINTS)

पर्सिस्टेंट सिस्टम्स (PERSISTENT)

ए यू बँक (AUBANK)

व्होल्टास (VOLTAS)

एल. अँड टी. टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लिमिटेड (LTTS)

भारतीय कंटेनर निगम लिमिटेड (CONCOR)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com