शेअर बाजारातील तेजीला ब्रेक

पीटीआय
Friday, 29 May 2020

आज शेअर बाजारातील तेजीला ब्रेक लागला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी आणि मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स या दोन्ही निर्देशांकात घसरण नोंदवण्यात आली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १०अंशांची तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ११२ अंशांची घसरण सकाळच्या सत्रात दिसून आली. सेन्सेक्स ३२,११७ अंशांच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. तर निफ्टी ९,४९४ अंशांच्या पातळीवर व्यवहार करतो आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शेअर बाजारात नफावसूली झालेली दिसून आली. त्याचबरोबर आयटी, फार्मा, धातू क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये मात्र तेजी दिसून आली. विप्रो, भारतीएअरटेल या कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत वाढ झाली आहे.

निफ्टी बॅंक आणि निफ्टी ऑटो निर्देशांकांमध्ये मागील तीन दिवसांपासून असलेल्या तेजीला काहीसा ब्रेक लागला आहे.

कोरोनानंतरचं जग कसं असेल? अशी असेल उद्योगधंद्याची स्थिती

औषधनिर्माण कंपन्यांच्या शेअरच्या किंमतींनीसुद्धा उसळी घेतली आहे. कोळसा, ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीतसुद्धा वाढ झाली आहे.

कच्च्या तेलाच्या किंमतींमध्येही घट नोंदवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीतसुद्धा घसरण झाली आहे. एमसीएक्सवर कच्चे तेल २४६१ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करते आहे.

महत्त्वाची बातमी : आता 10 मिनिटांत मिळवा 'पॅन'

तर डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात मात्र थोडी घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 0.२४ रुपयांनी घसरला आहे. आंतरराष्ट्रीय चलन बाजारात  डॉलरच्या तुलनेत रुपया ७५.५० रुपये प्रति डॉलरवर व्यवहार करतो आहे.

* सेन्सेक्स ३२,००० अंशांच्या पातळीवर
* निफ्टी ९,४९४ अंशांच्या पातळी खाली 
* निफ्टीमध्ये १० अंशांची घसरण
* सेन्सेक्समध्ये ११२ अंशांची घसरण

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Share market reports decline