esakal | शेअर बाजारात तेजीची हॅट्रीक; सेन्सेक्समध्ये २५० अंशांची उसळी
sakal

बोलून बातमी शोधा

शेअर बाजारात तेजीची हॅट्रीक; सेन्सेक्समध्ये २५० अंशांची उसळी

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये २५० अंशांची उसळी सकाळच्या सत्रात दिसून आली.सेन्सेक्स ३१,००० अंशांच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. तर निफ्टी ९,१०० अंशांच्या पातळीच्या वर व्यवहार करतो आहे.

शेअर बाजारात तेजीची हॅट्रीक; सेन्सेक्समध्ये २५० अंशांची उसळी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

आज सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजाराने तेजी दाखवली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी आणि मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स या दोन्ही निर्देशांकात वाढ नोंदवण्यात आली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ७५ अंशांची तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये २५० अंशांची उसळी सकाळच्या सत्रात दिसून आली. सेन्सेक्स ३१,००० अंशांच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. तर निफ्टी ९,१०० अंशांच्या पातळीच्या वर व्यवहार करतो आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

विमानसेवा कंपन्या, बजाज ऑटो यांच्या शेअरच्या किंमतीत वाढ झालेली दिसून आली. २५ मेपासून देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय नागरी उड्डाण मंत्रालयाने जाहीर केला आहे. त्याचा सकारात्मक परिणाम विमानसेवा कंपन्यांच्या शेअरवर दिसून आला आहे. निफ्टी बॅंक आणि निफ्टी ऑटो निर्देशांकात एक टक्क्यांपेक्षा अधिक तेजी बाजार सुरू झाल्यानंतर नोंदवण्यात आली.

Lockdown : भारतात प्रत्येक राज्यात घराबाहेर पडण्याचे प्रमाण वाढले

* सेन्सेक्स ३१,००० अंशांच्या पातळीवर
* निफ्टी ९,१०० अंशांच्या पातळीच्या वर 
* निफ्टीमध्ये ७५ अंशांची उसळी
* सेन्सेक्समध्ये २५० अंशांची उसळी

याशिवाय सरकारने ऑनलाईन मद्यविक्रीस परवानगी दिल्याचा परिणाम बेवरेजेस आणि लिकर उत्पादक कंपन्यांच्या शेअरवर झाला आहे. बेवरेजेस आणि लिकर उत्पादक कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी आली आहे. याशिवाय औषधनिर्माण कंपन्यांच्या शेअरच्या किंमतींनीसुद्धा ५ टक्क्यांची उसळी घेतली आहे. सिमेंट उत्पादक कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीतसुद्धा वाढ झाली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कच्च्या तेलाच्या किंमतींमध्येही तेजी नोंदवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीतसुद्धा वाढ झाली आहे. एमसीएक्सवर कच्चे तेल २६१९ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करते आहे.

तर डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात मात्र थोडी घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 0.02 रुपयांनी घसरला आहे. आंतरराष्ट्रीय चलन बाजारात  डॉलरच्या तुलनेत रुपया 75.77 रुपये प्रति डॉलरवर व्यवहार करतो आहे.

loading image
go to top