esakal | शेअर बाजारात 'रोलर कोस्टर'
sakal

बोलून बातमी शोधा

Share market

एका बाजूला जागतिक पातळीवर आर्थिक व्यवहार सुरळीत होतानाच दुसऱ्या बाजूला अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात चिंताही व्यक्त करण्यात येते आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये काहीसे गोंधळाचे वातावरण आहे. अर्थात गुंतवणूकदारांचा कल सकारात्मकच आहे. संधी मिळेल तेव्हा गुंतवणूकदार नफावसूली करताना दिसत आहेत.

शेअर बाजारात 'रोलर कोस्टर'

sakal_logo
By
वृत्तसंस्था

आज शेअर बाजारात चढ उतारांचा खेळ बघायला मिळाला. सकाळपासून शेअर बाजारात सकारात्मक पद्धतीने व्यवहार करत होता. सेन्सेक 225 अंशांच्या पातळीवर वधारला होता. तर निफ्टीमध्येही जवळपास 100 अशांची सुधारणा झाली होती. मात्र त्यानंतर सतत बाजारात चढ उतार नोंदवण्यात आले. अर्थात बाजार काल ज्या पातळीवर बंद झाला होता त्या पातळीच्या वरच हे सर्व चढ उतार होत होते. 

  अमेरिका महामंदीच्या विळख्यात अडकण्याची शक्यता

गुंतवणूकदारांनी दाखवलेल्या उत्साहामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि निफ्टीसुद्धा सकाळच्या सत्रात वधारला होता. मात्र नफावसुलीमुळे बाजारात घसरण झाली. सध्या सेन्सेक्स 112 अंशांच्या वाढीसह 34,068 पातळीवर व्यवहार करतो आहे. तर निफ्टीमध्ये 22 अंशांची वाढ नोंदवत 10,069 अंशांच्या पातळीवर व्यवहार करतो आहे.

एका बाजूला जागतिक पातळीवर आर्थिक व्यवहार सुरळीत होतानाच दुसऱ्या बाजूला अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात चिंताही व्यक्त करण्यात येते आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये काहीसे गोंधळाचे वातावरण आहे. अर्थात गुंतवणूकदारांचा कल सकारात्मकच आहे. संधी मिळेल तेव्हा गुंतवणूकदार नफावसूली करताना दिसत आहेत.

'टर्म इन्श्युरन्स', आर्थिक नियोजनाचा महत्त्वाचा खांब

सरलेल्या आठवड्यात अमेरिकेतून रोजगाराबाबत सकारात्मक आकडेवारी समोर आल्याचाही परिणाम बाजारावर झाला आहे.
देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. मात्र देशात दीर्घकालीन लॉकडाउन केल्यामुळे अर्थचक्र मंदावले आहे. परिणामी येत्या तिमाहीत कंपन्यांच्या महसुलात मोठी घट होण्याची शक्यता आहे. शिवाय केंद्र आणि राज्य सरकारच्या  महसुलात मोठी घसरण झाली. यामुळे केंद्र सरकारने पुढील वर्षापर्यंत नव्या कोणत्याही योजना आणणार नसल्याचे जाहीर केले आहे. 

निफ्टी बँकसह अनेक निर्देशांकात सुधारणा नोंदवण्यात आली आहे. बँका आणि वित्तीय कंपन्यांच्या शेअरमध्ये चढ आणि उतार दोन्ही बघण्यात आले. बजाज फिनसर्व्हच्या शेअरमध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. बजाज ऑटो, हिरो मोटोकॉर्प यांच्या शेअरमध्येही घसरण झाली आहे. तर इंडसइंड बँक, टीसीएस, श्री सिमेंट्स, हिन्डाल्को या कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत घसरण झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कच्चे तेल
कच्च्या तेलाच्या किंमतीत काहीशी घसरण झाली आहे.एमसीएक्सवर कच्चे तेल 2869 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करते आहे.

तर डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात सुधारणा झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 0.025 रुपयांनी वधारला आहे. आंतरराष्ट्रीय चलन बाजारात  डॉलरच्या तुलनेत रुपया 75.58 रुपये प्रति डॉलरवर व्यवहार करतो आहे.