esakal | Share Market : SAILला मागे टाकत 'या' रेल्वे कंपनीची घोडदौड
sakal

बोलून बातमी शोधा

IRCTC

Share Market : SAILला मागे टाकत 'या' रेल्वे कंपनीची घोडदौड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

--शिल्पा गुजर

आयआरसीटीसीच्या (IRCTC) शेअर्सची मागणी शेअर स्प्लिट प्लॅन (share split plan) जाहीर झाल्यापासून चांगलीच वाढली आहे. गेल्या एकाच महिन्यात आयआरसीटीसीचे (IRCTC) शेअर्स 32 टक्क्यांनी वाढले आहेत, तर सेन्सेक्सही 8 टक्क्यांनी वाढला आहे.

हेही वाचा: एकता आणि शोभा कपूर यांचे वेतन प्रस्ताव शेअर होल्डर्सनी धुडकावले

रेल्वेच्या इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या (IRCTC) शेअर्समधील तेजी मंगळवारीही सुरू राहिली. बीएसईवर (BSE) ट्रेडिंग दरम्यान कंपनीचा शेअर 9 टक्क्यांनी वाढून 3,285 रुपयांच्या नव्या विक्रमावर पोहोचला. याआधी सोमवारी, आयआरसीटीसीला देशातील टॉप 100 सर्वात मौल्यवान कंपन्यांच्या यादीत स्थान मिळाले. आजच्या तेजीनंतर आयआरसीटीसीच्या (IRCTC) मार्केट कॅपने पहिल्यांदाच 50,000 कोटींचा टप्पा ओलांडला.

हेही वाचा: टेक्सल इंडस्ट्रीज Rights Issue च्या Equity Shares चे मूल्य

दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये 14 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या एका महिन्यात आयआरसीटीसीचे (IRCTC) शेअर्स 32 टक्क्यांनी वाढले आहेत, तर सेन्सेक्स 8 टक्क्यांनी वाढला आहे. आयआरसीटीसी सध्या देशातील 88 वी सर्वात मौल्यवान कंपनी आहे. ज्याचे मार्केट कॅप 52,416 कोटी रुपये असल्याचे बीएसईची (BSE) आकडेवारी सांगते. मंगळवारच्या तेजीनंतर कंपनीने मार्केट कॅपच्या बाबतीत स्टील क्षेत्रातील दिग्गज स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाला (SAIL) मागे टाकले आहे.

शेअर्सची मागणी का वाढली ?

आयआरसीटीसी शेअर्सची मागणी शेअर स्प्लिट प्लॅन जाहीर झाल्यापासून वाढली आहे. 12 ऑगस्टला कंपनीच्या बोर्डाने भांडवली बाजारात (Capital Market) तरलता (Liquidity) वाढवण्यासाठी, शेअरहोल्डर बेस वाढवण्यासाठी आणि छोट्या गुंतवणूकदारांना शेअर्स अधिक आकर्षक वाटावेत यासाठी 1:5 च्या प्रमाणात शेअर्सचे वितरण करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. बोर्डाने 10 रुपयांच्या फेस व्हॅल्यूचा (Face Value) शेअर प्रत्येकी 2 रुपयांच्या 5 शेअर्समध्ये विभाजित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्याला अद्याप रेल्वे मंत्रालयाची मंजुरी मिळणे बाकी आहे.

loading image
go to top