esakal | Share Market: 53 हजारांवरून सेन्सेक्सची पुन्हा एकदा घसरण
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market: 53 हजारांवरून सेन्सेक्सची पुन्हा एकदा घसरण

sakal_logo
By
कृष्णा जोशी

जाणून घ्या सोन्या-चांदीचे भाव

मुंबई: नफावसुलीमुळे सेन्सेक्स आज तिसऱ्यांदा 53 हजारांवर टिकून राहण्यात अपयशी ठरला. व्यवहारादरम्यान 53,129 चा टप्पा गाठलेला सेन्सेक्स दिवसअखेरीस 18 अंशांची घट नोंदवून 52,861 अंशांवर बंद झाला. सेमीकंडक्टर चीप च्या तुटवड्याच्या बातमीमुळे टाटा मोटर्स आज सुमारे साडेआठ टक्के (29 रु.) कोसळला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीदेखील 16 अंशांची घट दाखवीत 15,818 अंशांवर बंद झाला. दिवसभर तेजीत असलेले निर्देशांक शेवटच्या तासाभरात नफावसुलीमुळे कोलमडले. 22 जून व 28 जून रोजीही सेन्सेक्सने दिवसभराच्या व्यवहारादरम्यान 53 हजारांच्या वर मजल मारली होती, पण तेथे तो टिकू शकला नाही. 23 जून रोजी एकच दिवस सेन्सेक्स 53 हजारांच्यावर टिकला होता. (Share Market Sensex closes Below 53000 Nifty falls by 16 Points)

हेही वाचा: १२ आमदारांच्या निलंबनानंतर भाजपची ठाकरे सरकारविरुद्ध निदर्शने

आज बँका व अर्थसंस्थाच्या समभागांमध्ये वाढ झाली, तर वाहनउद्योग व धातूनिर्मिती कंपन्यांच्या समभागांचे दर घसरले. बजाज फायनान्सचे जून तिमाहीचे निकाल उत्तम आल्याने त्याच्या समभागाच्या दरात 131 रुपयांनी वाढ होऊ तो 6,203 रुपयांवर बंद झाला. अल्ट्राटेक सिमेंट 216 रुपयांनी (बंद भाव 6,935 रु.) वाढला तर एचडीएफसी बँक देखील 39 रुपयांनी वाढला.

हेही वाचा: काल जे घडलं ते महाराष्ट्राच्या परंपरेला लाजवणारं - उद्धव ठाकरे

सेमीकंडक्टर चीप च्या तुटवड्यामुळे जग्वार लँडरोव्हरच्या विक्रीत निम्मी घट शक्य आहे, असे टाटा मोटर्सतर्फे आज मुंबई शेअर बाजाराला कळविण्यात आले. जून तिमाहीपेक्षा सप्टेंबर तिमाहीत हा तुटवडा जास्त येऊ शकतो, असेही त्यांनी कळवल्यामुळे आज टाटा मोटर्सचा समभाग 29 रुपयांनी (8.41 टक्के) कोलमडला. आज सकाळी व्यवहारादरम्यान तो 358 रुपयांपर्यंत म्हणजे आपल्या सर्वकालिक उच्चांकी स्तराच्या जवळपास गेला होता. मात्र ही बातमी आल्यावर तो 311 पर्यंत कोसळून शेवटी 316.95 रुपयांवर स्थिरावला. 12 एप्रिलनंतरची टाटा मोटर्स मधील ही दुसरी मोठी घसरण आहे. आज राष्ट्रीय शेअर बाजारावर या समभागाचे 16 कोटी 40 लाख व्यवहार झाले. तीन एप्रिल 2020 रोजी 65 रुपयांचा तळ गाठलेला टाटा मोटर्स तेथून सहापट वाढला आहे. त्याखेरीज आज टेक महिंद्र सव्वादोन टक्के घसरला तर टीसीएस 59 रुपयांनी (3,262 रु.) पडला. मारुतीचा समभागही 85 रुपयांनी पडून 7,511 रुपयांवर स्थिरावला.

आजचे सोन्या-चांदीचे दर

सोने - 47,750 रु.

चांदी - 70,600 रु.

(संपादन- विराज भागवत)

loading image