esakal | १२ आमदारांच्या निलंबनानंतर भाजपची ठाकरे सरकारविरुद्ध निदर्शने
sakal

बोलून बातमी शोधा

BJP-12-MLA-Protest

१२ आमदारांच्या निलंबनानंतर भाजपची ठाकरे सरकारविरुद्ध निदर्शने

sakal_logo
By
विराज भागवत

कांदिवलीमध्ये शेकडो भाजपा कार्यकर्त्यांना करण्यात आली अटक

मुंबई: विधीमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले. या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून संतप्त निदर्शने केली. जनताही या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सामील झाली. मात्र, कोरोनाचा धोका लक्षात घेता कांदिवली पूर्व परिसरात पोलिसांनी भाजपा कार्यकर्त्यांना अटक केली. (BJP protests against Thackeray government after suspension of 12 MLAs in Vidhan Sabha Adhiveshan)

हेही वाचा: केंद्र सरकारच्या धरसोड वृत्तीमुळे किंमत मोजावी लागली आहे - पृथ्वीराज चव्हाण

विधानसभा अध्यक्षांच्या चेंबरमध्ये शिवीगाळ केल्याचा ठपका ठेवून तालिका अध्यक्षांनी आमदार अतुल अतुल भातखळकर, योगेश सागर, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, पराग अळवणी, राम सातपूते, हरीश पिंगळे, संजय कुटे, जय कुमार रावल, नारायण कुटे, बंटी भांगडीया या भाजपाच्या १२ आमदारांना निलंबित केले. शिवीगाळ शिवसेनेच्या आमदाराने केला, असा आरोप भाजपाकडून सातत्याने करण्यात आला. पण ठपका मात्र भाजपा आमदारांवर ठेवण्यात आला.

हेही वाचा: 'हौसले झुक ना पायेंगे...'; फडणवीसांचा सरकारला शायरीतून इशारा

या निर्णयाविरोधात आमदार अतुल भातखळकर यांच्या कांदिवली पूर्व विधानसभेत कार्यकर्ते काळे झेंडे घेऊन सकाळीच रस्त्यावर उतरले. वसूली सरकारचा निषेध असो, ठाकरे सरकार हाय, हाय... अशा घोषणा देऊन त्यांनी संतप्त निदर्शनने केली. निलंबनाने जनतेतही असलेला आक्रोश या निमित्ताने समोर आला असून आंदोलनात जनताही उत्स्फूर्तपणे सामील झाली, असे सांगण्यात आले.

हेही वाचा: विधानभवनाबाहेर राडा; भाजप नेत्यांकडून माईक, स्पिकर काढून घेतला...

"हे ठरवून रचलेले कारस्थान होते. सरकारविरुद्ध सातत्याने आक्रमक असलेल्या आमदारांना हा बनाव रचून लक्ष्य करण्यात आले. त्यांना विधीमंडळाच्या कामकाजापासून दूर ठेवण्याचा हा डाव आहे. १७० आमदार हाताशी असून ठाकरे सरकारची तंतरली आहे", अशी टीका करून मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी सरकारची खेळी उघड केली.

loading image