Stock Market |20 हजाराचे 1 कोटी; जाणून घ्या किती वर्षांत मिळाला भरघोस परतावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

संयम हा शेअर बाजारातील गुंतवणुकीचा कानमंत्र आहे.

20 हजाराचे 1 कोटी; जाणून घ्या किती वर्षांत मिळाला भरघोस परतावा

अर्थात लाँग टर्मसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. गुंतवणूकदारांनी कंपनीचे व्यवसाय मॉडेल, त्याचा दृष्टीकोन, त्याचे फांडामेंटल्स यासारख्या गोष्टीचा विचार करून गुंतवणूक करावी, असे शेअर बाजार तज्ज्ञ सांगतात. संयम हा शेअर बाजारातील गुंतवणुकीचा कानमंत्र आहे.

भारत रसायनचे (Bharat Rasayan) शेअर्स हे गुंतवणूकारांसाठी एक उत्तम उदाहरण ठरले आहे, याचे शेअर्स 20 वर्षांपूर्वी 20 रुपयांवर होते. या 20 वर्षांत 500 पट वाढीसह ते 9895 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. भारत रसायनच्या (Bharat Rasayan) शेअर्सच्या इतिहासावर एक नजर टाकल्यास गेल्या 6 महिन्यांपासून हे शेअर्स खाली घसरले आहेत. गेल्या 6 महिन्यांत हा शेअर 12,682 रुपयांनी घसरून 9985 रुपये प्रति शेअर झाला आहे. या कालावधीत त्यात 20 टक्क्यांची घट झाली आहे.

हेही वाचा: ITR भरण्याचे 8 मोठे फायदे! इन्कम टॅक्स रिटर्न का भरला पाहिजे?

गेल्या एका वर्षात हा स्टॉक 8710 रुपयांवरून 9985 रुपयांपर्यंत वाढला आहे. या शेअरने एका वर्षात सुमारे 15 टक्के परतावा दिला आहे. गेल्या 5 वर्षात हा स्टॉक 2910 रुपयांनी वाढून 9995 रुपयांवर पोहोचला आहे. या कालावधीत त्यात 425 टक्के वाढ झाली आहे. गेल्या 10 वर्षांत हा स्टॉक 110 रुपयांवरून 9985 रुपयांपर्यंत वाढला आहे. 10 वर्षात 8975 टक्के परतावा दिला आहे.

या शेअरचा 20 ते 9985 रुपयांपर्यंतचा प्रवास बघितला तर जर एखाद्या गुंतवणूकदाराने 6 महिन्यांपूर्वी 20,000 रुपये गुंतवले असते, तर आज 20,000 रुपये 16,000 पर्यंत खाली आले असते. पण त्याच गुंतवणूकदाराने एका वर्षापूर्वी 20,000 रुपये गुंतवले असते तर आज 20,000 रुपये 23,000 झाले असते. त्याचप्रमाणे, जर 5 वर्षांपूर्वी 20,000 रुपये गुंतवले असते, तर हे 20,000 रुपये आज 1.05 लाख रुपये झाले असते. त्याचप्रमाणे, 20 वर्षांपूर्वी एखाद्याने 20 रुपये प्रति शेअर दराने 20,000 रुपये गुंतवले असते, तर आज 20,000 रुपये 1 कोटी रुपये झाले असते.

हेही वाचा: सावधान! फसवणुकीबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना इशारा

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

loading image
go to top