कमाईची मोठी संधी! लवकरच 'या' 6 कंपन्यांचे IPO येणार; वाचा कोणते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ipo

सेबीने मेडप्लस हेल्थ सर्व्हिसेस, रेटगेन ट्रॅव्हेल टेक्नॉलॉजीज, फ्युजन मायक्रो फायनान्ससह 6 कंपन्यांच्या IPO ला ग्रीन सिग्नल दिला आहे.

कमाईची मोठी संधी! लवकरच 'या' 6 कंपन्यांचे IPO येणार

sakal_logo
By
शिल्पा गुजर

IPO : जर तुम्ही IPO च्या माध्यमातून शेअर बाजारात प्रवेश करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी मोठी संधी चालून आली आहे. सेबीने फार्मसी रिटेल चेन मेडप्लस हेल्थ सर्व्हिसेस, ट्रॅव्हल टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस, फर्म रेटगेन ट्रॅव्हल टेक्नॉलॉजीज, मायक्रोलेंडर फ्यूजन मायक्रो फायनान्ससह 6 कंपन्यांना आयपीओसाठीची मान्यता दिली आहे.

रिटेल वेल्थ मॅनेजमेंट कंपनी, प्रुडंट कॉर्पोरेट ऍडव्हायझरी, प्रायव्हेट मार्केट, इंटेलिजेंस प्लॅटफॉर्म, ट्रॅक्सन टेक्नॉलॉजीज आणि रिअल इस्टेट डेव्हलपर पुराणिक बिल्डर्स यांचाही आयपीओ येणार आहे. या सहाही कंपन्यांनी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान आयपीओचे पेपर्स दाखल केले होते. त्यांना 16 ते 18 नोव्हेंबर दरम्यान ऑब्‍जर्व्हेशन लेटर मिळाले आहे. मार्केट रेग्‍युलेटर सेबीच्या भाषेत ऑब्‍जर्व्हेशन लेटर जारी करणे म्हणजे IPO साठी ग्रीन सिग्नल असा आहे.

हेही वाचा: Paytm IPO: पेटीएमचा आयपीओ येणार; काय असेल किंमत? जाणून घ्या

मेडप्लस हेल्थ सर्व्हिसेस: 1639 कोटींचा IPO

मेडप्लस हेल्थ सर्व्हिसेसच्या 1,639 कोटीच्या IPO मध्ये 600 कोटींचे फ्रेश इक्विटी शेअर्स आणि ऑफर फॉर सेलद्वारे (OFS) 1,038.71 कोटींचे इक्विटी शेअर्स समाविष्ट आहेत. OFS मध्ये, प्रमोटर्स आणि विद्यमान भागधारक त्यांचे स्टेक कमी करतात.

रेटगेन ट्रॅव्हल टेक्‍नोलॉजीजच्या (Rategain Travel Technologies) इश्युमध्ये 400 कोटींचे फ्रेश इक्विटी शेअर्स आणि ओएफएसद्वारे (OFS) 2.26 कोटी शेअर्स असतील.

फ्यूजन मायक्रो फायनान्सच्या आयपीओमध्ये 600 कोटी रुपयांचे फ्रेश इक्विटी शेअर्स आणि ऑफर फॉर सेलद्वारे (OFS) 2.19 कोटी इक्विटी शेअर्स असतील. त्याचप्रमाणे, प्रुडंट कॉर्पोरेट एडव्हायजरी सर्व्हिसेज 85,49,340 इक्विटी शेअर्स OFS द्वारे संपूर्ण आयपीओ आणणार आहे.

हेही वाचा: या आठवड्यात दोन IPO भरू शकतात तुमची तिजोरी

ट्रॅक्‍सन टेक्‍नोलॉजीज (Traxon Technologies) आणणार ओएफएस रिअल इस्टेट कंपनी पुराणिक बिल्डर्सच्या IPO मध्ये रु. 510 कोटींचे फ्रेश इक्विटी शेअर्स आणि 9.45 लाख इक्विटी शेअर्सचे OFS असतील. कंपनीचे प्रमोटर्स OFS मधील स्टेक कमी करतील. त्याचप्रमाणे, ट्रॅक्‍सन टेक्‍नोलॉजीजच्या IPO मध्ये देखील OFS 3.86 कोटी इक्विटी शेअर्स असतील. यामध्ये प्रमोटर्स आणि गुंतवणूकदार दोघेही शेअर्स विकतील. सर्व सहा कंपन्यांचे शेअर्स BSEआणि NSE वर लिस्ट केले जातील.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

loading image
go to top