Share Market : पाइप बनवणाऱ्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये आहेत तेजीचे संकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market : पाइप बनवणाऱ्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये आहेत तेजीचे संकेत

शेअर बाजारात सध्या अस्थिरतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. शिवाय अनेक शेअर्समध्ये प्रॉफिट बुकींग होताना दिसत आहे. अस्थिर बाजारात निर्देशांक घसरणीसह व्यवहार करताना दिसतात. शेअर बाजार घसरणीवर असतानाही काही शेअर्स तेजीसह वाढताना दिसत आहेत.

फार कमी शेअर्स असे असतात ज्यांच्यावर मार्केटचा फारसा परिणाम होत नाही. अशाच काही शेअर्समध्ये फिनोलेक्स इंडस्ट्रीज (FINPIPE) स्टॉकची गणना होते. कारण सध्या या शेअर्समध्ये चांगली वाढ होताना दिसते आहे. नुकताच हा शेअर तब्बल 8% वाढला.यात सुमारे 20 लाख शेअर्सची खरेदी झाल्याचे समजतेय, जी अलीकडच्या काळातील सर्वाधिक आहे.

हेही वाचा : सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

तांत्रिकदृष्ट्या विचार केल्यास या स्टॉकने बुलिश बार तयार केला आहे आणि हायर हायवर ट्रेड करत आहे. शिवाय सर्व प्रमुख मूव्हिंग एव्हरेजवर आहे आणि सर्व मूव्हिंग एव्हरेज अपट्रेंडमध्ये आहेत. अशा प्रकारे सर्व टाइमफ्रेममध्ये तेजीचे सिग्नल आहे.

विशेष म्हणजे, याने मागील डाउनट्रेंडचे 50% रिट्रेसमेंट व्हॅल्यू ओलांडली आहे, जी एक मजबूत रिव्हर्सल दाखवते. 14-दिवसांचा आरएसआय (68.49) बुलिश झोनमध्ये आहे आणि स्टॉकमधील मजबूतीचे संकेत देत आहे.

हेही वाचा: Anil Ambani : अनिल अंबानींच्या रिलायन्स कॅपिटलचे नवे मालक ठरले; 'या' कंपनीने जिंकला लिलाव

गेल्या 3 महिन्यांत स्टॉक जवळपास 30% वाढला आहे आणि त्याने ब्रॉड मार्केटला मागे टाकले आहे. सध्या फिनोलेक्स इंडस्ट्रीज (FINPIPE) स्टॉकची किंंमत एनएसईवर 190 रुपयांवर व्यवहार करत आहे. मोमेंटम सकारात्मक दिसत असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.