Share Market : या कंपनीने गुंतवणुकदारांना दिला भरभरुन रिटर्न, पुढेही तेजीचे संकेत...

ब्लू डार्टने शॉर्ट टर्ममध्येही आपल्या गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे.
Share Market
Share Market google

मुंबई : ब्लू डार्ट एक्स्प्रेस (Blue Dart Express) या कुरिअर सेवा पुरवणाऱ्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना कायमच दमदार रिटर्न दिला आहे. सध्या या शेअर्समध्ये आणखी तेजीचा कल दिसून येत आहे. यावर्षी हे शेअर्स सुमारे 13 टक्क्यांनी मजबूत झाले आहे आणि आणखी 10 टक्के वाढीचा कल दिसून येत आहे.

देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने यामध्ये गुंतवणुकीसाठी 8110 रुपयांचे टारगेट दिले आहे, जी सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे 10 टक्के जास्त आहे. ब्लू डार्ट एक्सप्रेसचे शेअर्स सध्या 7359.80 रुपयांवर ट्रेड करत आहेत.

Share Market
6 महिन्यात 115 टक्क्यांच्या रेकॉर्डवर, या स्टॉकमध्ये पुढेची तेजीचे संकेत...

13 नोव्हेंबर 2003 रोजी ब्लू डार्टचे शेअर्स केवळ 56 रुपयांवर होते. म्हणजे त्यावेळी यात एखाद्याने 1 लाख रुपये गुंतवले असते तर 19 वर्षात ते 131 पटीने वाढून 1.31 कोटी रुपये झाले असते. ब्लू डार्टने शॉर्ट टर्ममध्येही आपल्या गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे.

7 मार्च रोजी त्याच्या शेअर्सची किंमत 5428.45 रुपये होती, जी एका वर्षातील विक्रमी नीचांकी आहे. यानंतर, शेअर्सची खरेदी वाढली, त्यानंतर सात महिन्यांत ती 78 टक्क्यांनी मजबूत झाली आणि 9639.45 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचली. पण, सध्या हा शेअर या उच्चांकावरून सुमारे 24 टक्के सूटवरआहे.

Share Market
टिमकेन इंडियाच्या शेअर्समध्ये 20% तेजी, तुमच्याकडे आहे का हा स्टॉक...

ब्लू डार्टचा ऑर्गनाइज्ड एअर एक्सप्रेस सेगमेंटमध्ये 50% पेक्षा जास्त मार्केट शेअर आहे आणि आता ग्राउंड एक्सप्रेस सेगमेंटमध्ये त्याचा हिस्सा वाढवत आहे. कंपनीचा 65 टक्के महसूल एअर एक्सप्रेस आणि 35 टक्के ग्राउंड एक्सप्रेसमधून येतो.

अशात कंपनीचा निव्वळ नफा आर्थिक वर्ष 2022-24 दरम्यान 15 टक्क्यांच्या सीएजीआरने वाढू शकतो असा विश्वास देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने म्हटले आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com