Share Market Tips : गुंतवणुकदार झाले मालामाल! 3 वर्षात तिप्पट रिटर्न, 'या' केमिकल स्टॉकमध्ये तेजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market Tips

Share Market Tips : गुंतवणुकदार झाले मालामाल! 3 वर्षात तिप्पट रिटर्न, 'या' केमिकल स्टॉकमध्ये तेजी

Share Market Tips : शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी चांगले शेअर्स शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. शारदा क्रॉपकेमच्या (Sharda Cropchem) केमिकल स्टॉकने गुंतवणुकदारांना कायमच दमदार रिटर्न दिला आहे.

कोरोनानंतर तर या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे. एप्रिल 2020 मध्ये या शेअरची किंमत 105.05 रुपये होती, जी आता 512 रुपये झाली आहे.

याचा अर्थ गुंतवणूकदारांनी केवळ तीन वर्षांत तब्बल 387 टक्के नफा कमावला आहे. आता ब्रोकरेज हाऊस आनंद राठी यांनी या शेअरमध्ये आणखी वाढ अपेक्षित असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

बुधवारी शारदा क्रॉपकेमचे शेअर्स समभाग जवळपास 5 टक्क्यांनी वाढून 512 रुपये प्रति शेअरवर बंद झाले. ब्रोकरेज हाऊसला पुढील तीन महिन्यांत स्टॉकवर 22 टक्के परतावा अपेक्षित आहे. कंपनीचे शेअर्स 620 रुपयांपर्यंत जाऊ शकतात.

हेही वाचा : ...इथं बनतो आपला लाडका तिरंगा

याचा अर्थ सध्याच्या किंमतीत गुंतवणूकदारांना प्रति शेअर 108 रुपयांचा नफा होऊ शकतो. ब्रोकरेजने गुंतवणूकदारांना स्टॉकवरील 465 रुपयांवर स्टॉप लॉसचा सल्ला दिला आहे.

शारदा क्रॉपकेम प्रामुख्याने कृषी रसायने आणि कन्व्हेयर बेल्ट, रबर बेल्ट/शीट्स, रंग आणि डाय इंटरमीडिएट्स यांसारखी कृषी उत्पादने जगभरातील विविध बाजारपेठांमध्ये निर्यात करते. कंपनी प्रत्येक प्रदेशात आपली उत्पादने वाढवत आहे, नवीन बाजारपेठांचा शोध घेत आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.