Share Market : आज कोणते स्टॉक्स देतील बंपर कमाई?

share market
share marketsakal media
Summary

शेअर बाजार शुक्रवारी विक्रमी उच्चांकावर बंद झाला. शुक्रवारी बाजारात मोठी तेजी दिसली. त्यामुळेच सेन्सेक्स पहिल्यांदाच 60,000 च्या वर बंद झाला.

शिल्पा गुजर - शेअर बाजार शुक्रवारी विक्रमी उच्चांकावर बंद झाला. शुक्रवारी बाजारात मोठी तेजी दिसली. त्यामुळेच सेन्सेक्स पहिल्यांदाच 60,000 च्या वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टीसुद्धा पहिल्यांदाच 17,850 च्या वर बंद झाला. पण, मिड आणि स्मॉलकॅप निर्देशांक लाल रंगात अर्थात घसरणीवर बंद झाले. बीएसई मिडकॅप निर्देशांक 1.16 टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक 0.30 टक्क्यांवर बंद झाला.

शुक्रवारी बाजार संपल्यावर, सेन्सेक्स 163.11 अंकांनी अर्थात 0.27 टक्के वाढीसह 60,048.47 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 30.25 अंक म्हणजेच 0.17 टक्के वाढीसह 17,853.20 वर बंद झाला. आज अर्थात सोमवारी 'या' शेअर्सवर नजर ठेवा...

एमसीएक्स (MCX)
LTP: 1654 रुपयेTarget: 1750 रुपयेStop Loss: 1600 रुपये
स्टॉकमध्ये चांगली व्हॉल्युम दिसून येत आहे. टेक्निकल चार्टवरही हा स्टॉक मजबूत दिसत आहे.

टाटा केमिकल्स (Tata Chemicals)
LTP: 885.20 रुपयेTarget: 950 रुपयेStop Loss: 845 रुपये
टाटा केमिकल्सचे शेअर्स शुक्रवार नव्या उंचीवर पोहोचले. यात फ्लॅग पॅटर्नमुळे चांगला ब्रेकआउट बघायला मिळाला. टेक्निकल इंडीकेटर्स सुद्धा मजबूत असल्याने या स्टॉक्समध्ये तेजी दिसून येते आहे.

share market
शेअर बाजारात पुढच्या आठवड्यात ‘या’ घटकांवर ट्रेडर्सचं लक्ष

आयशर मोटर्स (Eicher Motors)
LTP: 2928 रुपयेTarget: 3100 रुपयेStop Loss: 2810 रुपये
काही काळाच्या घसरणीनंतर या शेअर्समध्ये पुन्हा तेजी दिसायला लागली आहे. टेक्निकल इंडिकेटरमध्ये RSI 60 च्या लेव्हलवर सपोर्टनंतर आणखी वर चढताना दिसतो आहे.

या काही शेअर्ससोबतच तुम्ही खालील काही महत्त्वाच्या शेअर्सवर देखील नजर ठेऊ शकतात.
एशियनपेन्ट्स ( ASIANPAINT) एम अँड एम (M&M) एचसीएल टेक HCLTECH BHARTIARTL इंडसटॉवर (INDUSTOWER) एलटीआय (LTI)बर्जपेंट्स (BERGEPAINT ) डीएलएफ (DLF) अल्केम (ALKEM) माईंडट्री (MINDTREE)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com