Share Market: शेअर बाजारात अस्थिरता, सेन्सेक्स निफ्टीत घसरण

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्याने त्याचा परीणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे
Share Market Updates | Stock Market news
Share Market Updates | Stock Market newsSakal

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्याने त्याचा परीणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. मात्र आज शेअर बाजार तेजीसह उघडला आणि प्री-ओपनिंगमध्येच सेन्सेक्स आणि निफ्टी चांगल्या वाढीसह व्यवहार करताना दिसले. मात्र सेन्सेक्स 250 अंकांनी वधारला तर परंतु लवकरच किरकोळ वाढीसह सपाट व्यवहार करताना दिसला. निफ्टी 50 निर्देशांक 0.20% सह 17,200 च्या वर होती. (Todays Share Market Updates)

Share Market Updates | Stock Market news
Share Market: शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्समध्ये 1,000 तर निफ्टीमध्ये 292 अंकांची घसरण

आठवड्याच्या पहिल्याच दिवसाच्या सुरुवातीला शेअर बाजार कोसळला होता. शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दिलं. सोमवारी दिवसाच्या सुरुवातीला सेन्सेक्स 1,000.35 अंकांनी घसरून 57,338.58 वर सुरु झाला तर निफ्टी 292.2 अंकांनी घसरून 17,183.45वर सुरु झाली होती. निफ्टी 50 मधील 42 शेअर्समध्ये दिवसाच्या सुरुवातील घट झाली, तर केवळ 8 शेअर्समध्ये वधारल्याचं पाहायला मिळालं तर सेन्सेक्स 1172 अंकांच्या घसरणीसह 57,166.74 च्या स्तरावर पोहोचला आणि निफ्टी 302 अंकांच्या घसरणीसह 17173 वर बंद झाला होता.

आर्थिक तिमाहित अहवाल आणि जागतिक आर्थिक बाजारातील नकारात्मक घटनांचा प्रभावामुळे प्रमुख निर्देशांकात तब्बल दोन टक्क्यांची घसरण नोंदविली गेली. गेल्या आठवड्यात इन्फोसिस (INFOSYS) व एचडीएफसीची (HDFC BANK) कामगिरी बाजारावर प्रभाव टाकू शकली नाही. त्यामुळे प्रमुख शेअर्समध्ये मोठ्या प्रमामात घसरण नोंदविली गेली. सोमवारी इन्फोसिस मध्ये दोन वर्षाच्या दरम्यान एका दिवसात नोंदविलेली सर्वाधिक घसरण दिसून आली.

Share Market Updates | Stock Market news
पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

मागच्या सुट्टीच्या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टी अनुक्रमे 1.8 टक्के (1,108.25 अंक) आणि 1.7 टक्क्यांनी (308.65 अंक) घसरले. 14 एप्रिलला आंबेडकर जयंती आणि महावीर जयंती तर 15 एप्रिलला गुड फ्रायडेनिमित्त बाजार बंद होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com