दोन दिवसांच्या घसरणीला ब्रेक, वाढीसह बंद झाला शेअरबाजार

अमेरिकन बाजारातील संकेताचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला.
Share Market Todays Updates | Stock Market news
Share Market Todays Updates | Stock Market newsSakal

आजचा दिवस शेअर मार्केटसाठी उत्तम दिवस म्हणता येईल. शेअर बाजार दोन दिवसाच्या घसरणीला ब्रेक लावत वाढीसह बंद झाला. निफ्टी 17,200 वर तर सेन्सेक्स 776 अंकांनी वाढत बंद झाला.

Share Market Todays Updates | Stock Market news
Share Market Update: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 700 अंकांनी वधारला

आज मंगळवारी शेअर बाजार चांगल्या तेजीसह उघडला. अमेरिकन बाजारातील संकेताचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक वधारल्याने सकाळी शेअर खरेदीचे संकेत मिळत होते.

सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स 487 अंकांच्या उसळीसह 57,066वर उघडला.

Share Market Todays Updates | Stock Market news
Petrol Diesel Price: देशात सर्वात महाग पेट्रोल विकलं जातंय महाराष्ट्रात

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सुरु असलेले पडझडीचं सत्रामुळे सोमवारी दिवसाअखेर शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. सोमवारी सकाळी सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी गॅप डाउन ओपनिंग दिलं, त्यानंतर दिवसभर ही पडझड सुरुच राहिली.

सोमवारी शेअर बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 617.26 अंकांनी म्हणजेच 1.08 टक्क्यांनी घसरून 56579.89 वर बंद झाला. तर निफ्टीही 218.00 अंकांनी म्हणजेच 1.27 टक्क्यांची घसरण होऊन 16,953.95बंद झाला. निफ्टी 50 मधील 42 शेअर्समध्ये मोठी घसरण झाली तर फक्त 8 शेअर्समध्ये वाढ झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com