शेअर बाजारात 'ब्लॅक फ्रायडे'; 3090 अंकांची घसरण

वृत्तसंस्था
Friday, 13 March 2020

अमेरिकेच्या निर्णयामुळे फटका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील महिन्याभरासाठी युरोपमधून अमेरिकेत प्रवासबंदी जाहीर केली आहे. त्याचाही फटका शेअर बाजाराला बसला आहे, असे सांगितले जात आहे. 

मुंबई : शेअर बाजाराच्या निर्देशांकात गेल्या काही दिवसांपासून मोठी घसरण सुरु आहे. त्यानंतर आजदेखील ही घसरण सुरुच आहे. आज सकाळी शेअर बाजार उघडला. त्यानंतर लगेचच निर्देशांकात तब्बल 3 हजार 90.62 अंकांची घसरण झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात 966.1 अंकांची घसरण झाली.

महाराष्ट्रात कोरोनाचे १४ रुग्ण; कर्नाटकात देशातील पहिला बळी

शेअर बाजार उघडल्यानंतर त्यामध्ये 3 हजार 90.62 अंकांची घसरण झाली. त्यानंतर हा अंक 29687.52 अंकांवर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकातही 966.1 अकांची घसरण होऊन तो 8624.04 अंकांवर पोहोचला. 

कोरोना व्हायरसचा अर्थव्यवस्थेवरही परिणाम होताना दिसत आहे. सकाळच्या सत्रात शेअर बाजाराच्या निर्देशांकात मोठी घसरण झाली होती. त्यामुळे 'लोअर सर्किट' लावण्यात आले आहे. 

शेअर मार्केट ज्यामुळे कोसळलं ते 'लोअर सर्किट' म्हणजे नक्की काय?

अमेरिकेच्या निर्णयामुळे फटका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील महिन्यासाठी युरोपमधून अमेरिकेत प्रवासबंदी जाहीर केली आहे. त्याचाही फटका शेअर बाजाराला बसला आहे, असे सांगितले जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Share Market Update Share Market Down Nifty Falls