Share Market Updates : नव्या वर्षाची ओपनिंग सकारात्मक; सेंसेक्स-निफ्टी उसळला!

सकाळ ऑनलाइन टीम
Friday, 1 January 2021

सेन्सेक्समध्ये  टीसीएस, एसबीआय, रिलायंन्स आणि बजाज ग्रुपच्या शेअरमध्ये तेजीचे वातावरण दिसले.

नव्या वर्षाच्या सुरुवातीला शेअर बाजारामध्ये सकारात्मक ओपनिंग झाल्याचे पाहायला मिळाले. सेन्सेक्स 183.24 अंशांनी वाढ नोंदवत  47,934.57 वर व्यवहार करत होता. सेन्सेक्समध्ये  टीसीएस, एसबीआय, रिलायंन्स आणि बजाज ग्रुपच्या शेअरमध्ये तेजीचे वातावरण दिसले. BSE मधील कंपन्यांच्या मार्केट कॅपने 188.90 लाख कोटीचा टप्पा ओलांडला.   

निफ्टी 14 हजार पार 

निफ्टीचा निर्देशांक 45.10 अंशांनी वाढून 14,026.85 वर व्यवहार करत होता.  टॉप गेनरमध्ये M&M च्या शेअर आघाडीवर होता. शेअर 2.07 टक्क्यांच्या वाढीसह  735.50 एवढ्या किंमतीवर व्यवहार करत होता. UPL, TCS, SBI आणि HDFC च्या शेअर्समध्ये 1-1 टक्के वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे हिंडाल्को, सन फार्मा आणि आयशर मोटरच्या शेअर पडल्याचे पाहायला मिळाले. सकाळी सेन्सेक्स 33.95 अंशांच्या वृद्धीसह 47,785.28 वर तर  निफ्टी 14.35 अंशांच्या वाढीसह खुला झाला. 

2021 देणार गूड न्यूज! वर्षअखेरपर्यंत अर्थव्यवस्था 'प्री-कोविड'सारखी होईल

गुरुवारी सेन्सेक्स 5.11 अंशांच्या वृद्धीसर 47,751.33 वर बंद झाला होता. बजाज, कोटक बँक, एक्सिस बँक, रिलायन्स आणि टीसीएसच्या शेअर्समध्ये घसरण झाली होती. बीएसईमध्ये 3,170 कंपनीच्या शेअर्सची खरेदी झाली. यात 54 टक्केच्या वाढीसह शेअर बाजार बंद झाला होता.

 2021-22 मध्ये अर्थव्यवस्था सुधारण्याची आस 

रेटिंग संस्था इक्रानुसार, 2021-22 या आर्थिक वर्षात जवळपास 10 टक्के ग्रोथ होईल अशी अपेक्षा आहे. याच संस्थेने यापूर्वी 2020-21 या वर्षात अर्थव्यवस्थेत 7-7.9 टक्के घसरण पाहायला मिळेल असा अंदाज वर्तवला होता. तो जवळपास खरा ठरला होता.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Share Market Updates Sensex Nifty UP in opening trade