Budget 2019 : शेअर बाजाराकडून 'बजेट'चे स्वागत 

Budget 2019 : शेअर बाजाराकडून 'बजेट'चे स्वागत 

मुंबई: अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात मोठे चैतन्य संचारले आहे. अर्थमंत्री पियुष गोयल यांनी देशातील सर्वच क्षेत्रातील नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत मध्यमवर्गीय करदाते, छोटे शेतकरी, असंघटित क्षेत्रातील कामगार, महिला बरोबरच शेवटच्या वर्गातील नागरिकांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून सेन्सेक्समध्ये 400 अंशांची वाढ झाली होती. सेन्सेक्स आज इंट्राडे व्यवहारात 36,778 अंशांची उच्चांकी पातळी गाठली होती. तर निफ्टीने 10,983 अंशांची उच्चांकी पातळी गाठली होती. प्रामुख्याने करदात्याला दिलासा देत 5 लाख रुपयांपर्यंतची सूट दिल्यानंतर शेअर बाजारात तेजी आली आहे. 

सध्या (दुपारी २ वाजता) सेन्सेक्स 128.37 अंशांनी वधारला असून तो 36385.06 अंशांवर व्यवहार करतो आहे. तर निफ्टी 30.85 अंशांनी वधारला आहे. तो 10861.80 अंशांवर व्यवहार करतो आहे. 

सध्या मुंबई शेअर बाजारात हिरोमोटो कॉर्प, मारुती, आयशर मोटर्स, एचसीएसएल टेक या कंपन्यांचे शेअर सर्वाधिक वधारले आहेत. तर झी, आयसीआयसीआय बँक, येस बँकेच्या शेअरमध्ये सर्वाधिक घरं नोंदवण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com