Yatra Online Ltd: 'या' ऑनलाइन कंपनीला मिळाली आयपीओसाठीची परवानगी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yatra Online Ltd

Yatra Online Ltd: 'या' ऑनलाइन कंपनीला मिळाली आयपीओसाठीची परवानगी...

Share Market: शेअर बाजारात आयपीओच्या माध्यमातून पैसे कमावण्याची संधी अनेक जण सोडत नाही, अशात दर दिवशी नवनव्या आयपीओबाबत माहिती येत असते. कारण शेअर मार्केटमध्ये लाँग टर्ममध्ये चांगला नफा मिळतो, पण आयपीओच्या माध्यमातून अगदी काही दिवसांत हा नफा कमावता येतो.

त्यामुळे बरेच जण आयपीओ त्यातल्या त्यात चांगल्या आयपीओच्या शोधात असतात. अशात यूएस स्टॉक मार्केट नॅस्डॅकमध्ये लिस्टेड 'यात्रा ऑनलाइन इंक' (Yatra Online Inc's) या कंपनीची भारतीय उपकंपनी यात्रा ऑनलाइन लिमिटेड (Yatra Online Ltd) लवकरच आयपीओ आणणार आहे. कंपनीला सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीकडून (SEBI) आयपीओ (IPO) आणण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. (Share Market)

750 कोटीचे फ्रेश शेअर्स

यात्रा ऑनलाइन इंक्सने (Yatra Online Inc's ) आयपीओबाबत ही माहिती दिली आहे. या आयपीओअंतर्गत कंपनीचे 750 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील. याशिवाय 93,28,358 इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) असेल. पण हा आयपीओ नेमका कधी येणार याबाबत अधिकृत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

मागच्या मार्चपासून तयारी

मार्चमध्ये दाखल केलेल्या आयपीओ कागदपत्रांनंतर यात्रा ऑनलाइन लिमिटेडला सेबीकडून मंजुरी मिळाल्याचे यात्रा ऑनलाइन इंकने एका निवेदनात म्हटले आहे. कंपनी आयपीओमधून उभारलेल्या निधीचा वापर धोरणात्मक गुंतवणूक, अधिग्रहण आणि व्यवसाय वाढीसाठी करेल असे म्हटले आहे.

हेही वाचा: Share Market Closing : 518 अंकांच्या घसरणीसह शेअर बाजार बंद; निफ्टी 18,159 अंकांवर

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.