Yes Bank Shares : येस बँकेचे शेअर्स खरेदी करावे का ? शेअर मार्केट एक्सपर्ट सांगतात... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yes Bank

Yes Bank Shares : येस बँकेचे शेअर्स खरेदी करावे का ? शेअर मार्केट एक्सपर्ट सांगतात...

Yes Bank Shares : खासगी क्षेत्रातील येस बँकेचे शेअर्स सुमारे 18 टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या आठवड्यात तो 17.45 रुपयांवर होता आणि आता 20.60 रुपयांवर पोहोचला आहे. पण तरीही तो 24.75 रुपयांच्या एका वर्षाच्या विक्रमी उच्चांकापेक्षा 17 टक्क्यांनी खाली ट्रेड करत आहे.

शुक्रवारी हा शेअर 20.85 रुपयांवर गेला. अशावेळी या शेअर्समध्ये गुंतवणूक कायम ठेवण्याचा सल्ला बाजारातील तज्ज्ञ देत आहेत. येस बँकेचे मार्केट कॅप 59,230.61 कोटी रुपये आहे.

हेही वाचा: Share Market : 65 पैशांचा 'हा' शेअर पोहोचला 306 रुपयांवर; तुमच्याकडे आहे का हा शेअर?

येस बँकेच्या शेअर्सची किंमत 30 मार्च 2022 रोजी 12.11 रुपये होती, जी एका वर्षातील विक्रमी नीचांकी आहे. यानंतर तो जवळपास 104 टक्क्यांनी वाढून 24.75 रुपयांवर पोहोचला. पण, त्यानंतर कोरोना आणि एनसीएलटीच्या दुहेरी त्रासामुळे यात घसरण सुरु झाली.

एनसीएलटीने येस बँकेचा रिअल इस्टेट डेव्हलपर विजय ग्रुप रिअल्टी विरुद्धचा 420 कोटी रुपयांचा दावा फेटाळून लावला होता. 21 डिसेंबरला इंट्रा-डेमध्ये सुमारे 7 टक्क्यांनी घसरण झाली होती.

हेही वाचा: Share Market : 'या' सरकारी फर्टिलायझर कंपनीच्या शेअर्समध्ये तेजीचे संकेत; तुमच्याकडे आहे का 'हा' शेअर?

येस बँकेच्या शेअर्समध्ये तेजीचा कल कायम राहू शकतो असे शेअर बाजार तज्ज्ञ प्रकाश गाबा यांनी म्हटले. हे शेअर्स लाँग टर्मपर्यंत ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. सध्या बँकेसोबत सर्वात मोठा कॉर्पोरेट टेकवे म्हणजे तिचा एनपीएचा भार कमी झाला आहे. बँकेने 48,000 कोटी रुपयांचे एनपीए जेसी फ्लॉवर्स ऍसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीकडे ट्रान्सफर केले आहेत.

त्याच वेळी, केंद्रीय बँक आरबीआयने अलीकडेच येस बँकेला सीए बास्क इन्व्हेस्टमेंट्स आणि व्हर्वेंटा होल्डिंग्स या दोन अमेरिकन खासगी इक्विटी कंपन्यांना सुमारे 20 टक्के हिस्सा विकून 8898 कोटी रुपये उभारण्यास मान्यता दिली. याशिवाय पुढील वर्षी येस बँकेत आणखी एक मोठा कॉर्पोरेट ऍक्टिविटी होणार आहे.

हेही वाचा: Share Market : 'हा' शेअर ऑल टाइम हायवर; 14 टक्क्यांच्या तेजीसह 3,710 रुपयांवर, जाणून घ्या माहिती

मार्च 2023 मध्ये येस बँकेच्या सुमारे 75 टक्के शेअर्सचे 3 वर्षांचे लॉक-इन संपेल, याचा अर्थ येस बँकेचे बरेच शेअर्स बाजारात खरेदी आणि विक्रीसाठी उपलब्ध होतील.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

टॅग्स :Share MarketYes Bank