Share Market : 'हा' शेअर ऑल टाइम हायवर; 14 टक्क्यांच्या तेजीसह 3,710 रुपयांवर, जाणून घ्या माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 share market

Share Market : 'हा' शेअर ऑल टाइम हायवर; 14 टक्क्यांच्या तेजीसह 3,710 रुपयांवर, जाणून घ्या माहिती

Share Market : ऑटो ऍन्सिलरी मॅन्युफॅक्चरर क्राफ्ट्समन ऑटोमेशनचे (Craftsman Automation) शेअर्स बीएसईवर इंट्राडेमध्ये सुमारे 14 टक्क्यांच्या तेजीसह 3,710.95 रुपयांवर गेले.

या शेअरचा हा आतापर्यंतचा ऑल टाइम हाय आहे. कंपनीने डीआर एक्झियन इंडियामधील (DR Axion India) 76 टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी डेफ्निटिव्ह ऍग्रीमेंट केले आहे.

ज्यामुळे या स्टॉकला सपोर्ट मिळत आहे. यासह, डीआर एक्झियन ही क्राफ्ट्समन ऑटोमेशनची नवीन उपकंपनी बनेल. सध्या क्राफ्ट्समन ऑटोमेशनचा शेअर 8.40 टक्क्यांनी वाढून 3,542 वर ट्रेड करत आहे.

क्राफ्ट्समन ऑटोमेशन कंपनी प्रवासी वाहने, व्यावसायिक वाहने आणि दुचाकींचा देशांतर्गत पुरवठा आणि निर्यात करते. शिवाय इंडस्ट्रियल कम्पोनंट्स आणि स्टोरेज सोल्यूशन्सशी संबंधित सेवाही देते.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये कास्ट आयर्न पॉवरट्रेन कॉम्पोनंट मॅचिंग, ऍल्युमिनियम कास्टिंग/मॅचिंग, स्पेशल पर्पज मशीन इत्यादींशी संबंधित सेवांचा समावेश आहे.

डिसेंबर 2006 मध्ये बांधलेले डीआर एक्झियन ऍल्युमिनियम सिलेंडर हेड्स बनवते. प्रवासी वाहनांमध्ये वापरला जाणारा हा महत्त्वाचा ऑटो घटक आहे.

हेही वाचा: Ratan Tata : ज्यांनी खिल्ली उडवली, त्यांनाच लावलं कामाला; टाटांचा पॅटर्नच वेगळा

याव्यतिरिक्त, कंपनी अंतर्गत कम्पस्टन इंजिनचे आउटर सेलही तयार करते. चेन्नईमध्ये कंपनीची मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आहे.डीआर एक्झियनचा आर्थिक वर्ष 2022 मध्ये 715 कोटी टर्नओवर होता.

क्राफ्ट्समन ऑटोमेशन डीआर एक्झियन या कंपनीसाठी 375 कोटी रुपये देईल आणि मार्च 2023 च्या अखेरीस हे एक्झिक्युशन पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. कंपनी अलीकडेच काही ब्लॉक डीलमुळे चर्चेत होती.

गुंतवणूकदार मरीना III (सिंगापूर) Pte Ltd ने 6 डिसेंबरला क्राफ्ट्समन ऑटोमेशनमधील 5.48 टक्के हिस्सा विकला. गुंतवणूकदार मरीना III ने 11.56 लाख शेअर्स 3,200 रुपये प्रति शेअर या दराने विकले. ही डील सुमारे 370 कोटी रुपयांना झाली होती.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.