'Shark Tank' चा इंटरनेट वर धुमाकूळ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shark Tank

'Shark Tank' चा इंटरनेट वर धुमाकूळ!

नवीन व्यवसाय सुरु करणे हे जितके रोमांचक वाटते,तितकेच कठीण आहे. विशेषतः जेव्हा व्यवसाय शून्यातून उभा करायचा असेल. तर त्यासाठी आणखी एक सर्वात महत्वाची गोष्ट असणे आवश्यक आहे जी त्या व्यवसायाला दीर्घकाळ सुरु ठेवेल आणि ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे'गुंतवणूक'. (investment). गुंतवणूकीशिवाय व्यवसाय टिकू शकत नाही, मग आता ही गुंतवणूक करायची कशी ? यासाठीच 'शार्क टॅंक' हा 'टेलेव्हीजन शो' तयार करण्यात आला आहे.

या शो मध्ये अनेक यशस्वी उद्योजक आपल्या व्यवसायाचे 'मॉडेल' लोकांपर्यंत पोहोचवतात. अमेरिकेत या शोचा 'प्रीमियर' होऊन बारा वर्षे उलटल्यानंतर आता हा 'बिझनेस रिअॅलिटी शो' भारतात आला असून गेल्या वर्षी २० डिसेंबरला तो प्रदर्शित झाला होता. उद्योजकांच्या 'स्ट्रॅटर्जीज' चा (Business strategies) शोध घेणारा हा शो चिंग नंतर केवळ एका महिन्यातच इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय.

त्यांच्या 'पंच लाइन्स' पासून ते त्यांच्या विनोदी प्रतिक्रियांपर्यंत अनेक 'मिम्स' देखील 'व्हायरल' (viral) होतायेत. या शोने काही छोट्या व्यवसायांसाठी चमत्कारिक कामगिरी केली आहे. शोचे काही घटक पूर्णपणे करमणुकीच्या उद्देशाचे असले तरी यात उद्योजकांसाठी अनेक मूल्यवान सल्ले दिले गेले आहेत. यशस्वी 'आन्ट्रप्रनर' (entrepreneur) होण्याची इच्छा बाळगणाऱ्या युवांनी तसेच भावी उद्योजकांनी हा शो नक्की फॉलो करावा.

Web Title: Shark Tank Show Hit On Social Media Know Some Facts About

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top