शीला फोमच्या शेअरची उद्या नोंदणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

मुंबई: स्लीपवेल मॅट्रेसेसची उत्पादक शीला फोमच्या शेअरची 9 डिसेंबर रोजी नोंदणी होणार आहे. यासाठी कंपनीने 730 रुपयेएवढी इश्यू प्राइस निश्चित केली आहे.

कंपनीची रु.510 कोटींच्या प्राथमिक समभाग विक्री(इनिशिअल पब्लिक ऑफरिंग-आयपीओ) योजना 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरदरम्यान पार पडली. अखेरच्या दिवशी आयपीओला पाचपट अधिक प्रतिसाद मिळाला. आयपीओसाठी कंपनीने प्रतिशेअर 680-730 रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला होता. कंपनीच्या एका शेअरचे दर्शनी मूल्य 5 रुपये आहे.

Web Title: Sheela Foam registration of the shares tomorrow

टॅग्स