‘श्रीराम ट्रान्सपोर्ट’ मसाला बाँड्सद्वारे उभारणार रु.200 कोटी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली: श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्सने डॉईश बँकेच्या सिंगापूर शाखेला 200 कोटी रुपयांच्या मसाला बाँड्सची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील कंपन्यांतर्फे परदेशी कंपन्यांना वाटप केल्या जाणाऱ्या कर्जरोख्यांना 'मसाला बाँड्स' असे संबोधले जाते. हे कर्जरोखे विकून कंपन्यांना रुपयात म्हणजेच भारतीय चलनात रक्कम मिळते.

"कंपनीने रुपयातील कर्जरोख्यांच्या खरेदीसाठी डॉईश बँक एजी, सिंगापूरसोबत करार केला आहे", अशी माहिती श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्सने मुंबई शेअर बाजारात दिली आहे.

सिंगापूर एक्सचेंज सिक्युरिटीज् ट्रेडिंग लिमिटेडवर कर्जरोख्यांची नोंदणी केली जाणार आहे. 18 फेब्रुवारी 2020 मध्ये मुदतपुर्ती होणाऱ्या कर्जरोख्यांवर 8.25 टक्के दराने व्याज मिळणार आहे.

Web Title: Shriram Transport to raise Rs 200 cr by via masala bonds